हुंडा हा समाजातील महारोग

रामजी नाईक यांचा मुलगा 18 वर्षाचा झाला. तेव्हा नगरीतील लोक रामजी नाईकास सांगतात की लग्न केले पाहिजे तेव्हा रामजी नाईकास वाटले मुलासाठी मुलगी शोधायला पाहिजे. रामजी नाईक यांनी अप्त जनाला बोलावुन सांगितले की, भीमासाठी सुंदर व योग्य मुलगी पहा भिमाचे वय 18 वर्षे झाले आहे. करीता त्यांचे विवाह करणे योग्य आहे. तेव्हा काही अप्तजन सांगतात आपन चित्तापुरासी जावे त्याठिकाणी रामजी जाधव वडते राहतात त्यांचे गावात थोर वैभव आहे तेव्हा रामजी नाईकांनी काही जानत्यांना मुलगी पहान्या करीता पाठविले तेव्हा रामजी नाईकांनी जानत्या सोबत किती हुंडा देतात हा निरोप दिला नाही. तर मुलगी गुणवान व सुंदर आहे का हे सांगितले पण आज समाजात हुंडा किती देता हा पहिला प्रश्न असतो रामजी नाईक काही जानते जयराम नाईकाच्या घरीजातात त्यांना पाहून जयराम नाईक अप्त जनाचे सन्मान केला व बसण्यास असन दिले. त्यांचे जेवनाची व्यवस्था करता व सर्वे आप्त जनांना आराम करण्यास सांगतात व नंतर विचारतात आपण कोणत्या प्रांतातुन आलात तेव्हा जानते भाऊ सांगतात मैशासुर थोर प्रांत आहे येथील रामजी नाईक आहेत त्यांचे कुळ राठोड कुळ आहे व ते आनंदाने राहतात.

आम्ही तुची मुलगी पाहण्याकरीता आलो आहोत तेव्हा जयराम नाईक विचारतात आमची मुलगी धरमणी आहे व ती सुंदर आहे तेव्हा धरमनीस जयराम नाईक विचारतात तुझीबी सहमती आहे काय तेव्हा धरमनी हिने विवाहासाठी सहमती दिली. तेव्हा जयराम नाईक म्हणतात लक्ष्मी नारायणाचा जोडा चांगला असावा अशाप्रकारे हुंडा घेणे व देणे दोन्ही पक्षाकडे मागणी केलेली दिसून येत नाही. पण आज समाजात मुलगी पहाण्याच्या अगोदरच हुंडा किती देता हा प्रश्न उभा आहे हा समाजासाठी घातक आहे. आज काही बांधव हुंडय़ासाठी बघीनीचा बळी घेतात व वस्तुसाठी सासू व सासरे व कुटूंबातील मंडळी त्या मुलीला घरची लक्ष्मी न समजता वैरी समजतात.

वधु पित्याची मानसीक व आर्थिक हाणी करून त्यांना संपविण्याचा प्रयत्न होत आहे. हा घोर पाप आहे. आज समाजात मध्यस्ती करणारे लोक सुध्दा उदारणार्थ दहा लाख पाच लाख हुंडा दिला पाहिजे त्यांचे घर, शेती, गाडी, संपत्ती आहे असे सांगतात पैशाच्या रूपात हुंडा मागणे व वस्तु मागणी करून भीक मागत आहे असे मला वाटते व वधु पिता नेहमी विनंती करतो मला सांभाळून घ्या काही वधु पित्याला वस्तूसाठी पाया पडावे लाते वर पित्याच्या मंडळी कडून व इतर गोष्टी मागणे अशोभनिय आहे. वर पित्याचागणी ही राक्षसी वृत्ती आहे. व त्यांच्या कुटूंबियास हे कळत नाही कि माझ्या घरी येणारी मुलगी ही लक्ष्मी आहे. तिचा सांभाळ चांगल्या प्रकारे केला पाहिजे. घरातील मुलाची आई व इतर लोकांनी वस्तुची मागणी करून वधु पित्याची माणसिक हाणीकरत असतात हे चुकिचे आहे.

हुंडा देणे-घेणे कशासाठी दुर्याधन वाटेल त्या मार्गाने युकत्या करून रत्ने गोळा केली पाहीजे. आम्ही रत्ने भोगणारी माणसे आहो आम्ही त्यासाठी जन्मलो आहोत असे आम्ही वाटेल त्या मार्गाणे रत्नेमिळवू असे पांडवकधीही बोलले नाहीत. उलट पांडव स्वतःहा रत्ना सारखे झाले आहे जिवनात जे पुर्ण आहेत ते लोक तेच लोक भगवंताचे काम करतात तेच लोक भगवंतांना आवडतात. यासाठी दुर्योधन व पांडव यांच्यात फरक आहे वाटेल त्या मार्गाने लबाडी करून सर्व काही मिळवतात असे पांडवाने कधीही केले नाही. पांडव लक्षागृहातुन वाचले आणि बाहेर आले व त्यांना अर्धे राज्य मिळाले त्यांची पुर्नरचना करायची होती पण पांडवाकडे पैसा नव्हता तर पूर्णर रचना करणार कशी तेव्हा भगवान श्री कृष्णाला वाटले पांडवाला पैसे देण्याकरीता जरी गेले तरी ते पैसे घेणार नाहीत भगवंताला प्रश्न पडला पांडवाला पैसे द्यावे कशा प्रकारे खरोखरच यासारखे सद भाग्य कोणाचेहीनाही. पुष्कळ लोक कोणाच्या घरचे खात नाहीत व कोणाच्या कार्यक्रमात जेवायला जावे लागले तर ताबडतोब पाच रूपये त्यांच्या मुलाच्या हातावर देतात. आज जर लोक ना दहा हजार फुकटचे मिळाले तर आनंदी होतात पांडव तेजस्वी होत पण ढोंगी नव्हते म्हणुन सुभेद्रचे अर्जुनाशी लग्न लावून दिले नंतर देण्याचा आमचा हक्क आहे व घेण्याचा तुचा हक्क आहे असे म्हणुन जे देण्याचे ते दिले.

सुभेद्राचे अर्जुनाशी लग्न करून देवुन अब्जावधी रूपये हुंडा म्हणुन दिला. भगवंताने पाडवाला हा पैसा प्रभु कार्यासाठी दिला भगवंताला खात्री होती पांडव सर्व संपत्ती भवंताच्या कामासाठी पुर्णरचनेसाठी वापरतील आणि पांडवांनी ते करूनदाखवले 29वर्षात समाजाचे रूप बदलुन दाखवले पांडव तेजस्वी होते दिलेला हुंडा दैवी कार्यात वापरला. पण आज काही लोक हुंडा मागतात कशासाठी काय श्रीमंत होण्यासाठी तेजस्वी जिवन जगणार्या राजाचे जिवन हरीष चंद्रचा मुलगा रोहीदास तहानेणे व्याकुळ झाला होता एवढय़ात समोर पाणपोई दिसली आणि तो पाणी पिण्यासाठी धावला व ओंजळीत घेऊन पाणी पिणार एवढय़ात तेथे हरिषचंद्र म्हणतात तु क्षत्रियाचा मुलगा आहेस. तु पाणपोईचे पाणि पितोस हे पाणी फेकुन दे असे सांगतात तु मेलास तरी चालेल तु फुकटचे पाणी पिऊ नकोस असे हरिषचंद्र तेजस्वी होते असे जिवन जगण्याचा प्रयत्न करूया व हुंडा न घेण्याचा व समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करूया.

मोहन बापुराव राठोड चोंडीकर
ता.लोहा.जि.नांदेड
मो. 9421768140