​डॉ. गणेश चव्हाण सर लिखित ‘भरकाडी’  (कथासंग्रह) 

“सामान्य जीवाचे तिमिरातून तेजाकडे जगणे आणि काळीज पिळवटून टाकणारा भावपूर्ण आलेख”
लेखक-प्रा.डॉ. गणेश चव्हाण

नागपूर

भरकाडी या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय

बोलके असून निळ्याशार भव्य आकाशातील ढग हे आशावाद दर्शवत असून शुष्क,खडकाळ जमीन , सर्वत्र वाळलेले गवत,आणि तरीही तग धरून उभे असलेले काही हिरवीगार झाडे झुडपे ही तेथील लोकजीवनाचे जगणे दर्शविते.

अशा विपरीत वातावरण,परिस्थितीतही एक सुंदर,देखणी तरुणी आपला परंपरागत शृंगार लेवून चेहऱ्यावर स्त्री सुलभ लज्जा,संकोच

स्मितरेखा घेऊन धरणीकडे नजर लावून उभी

आहे ,हे त्या जमातीतील रूढी,रितीरिवाज,

संयम,मर्यादा ,संकोच भाव प्रतिबिंबित करतात.

पाठपृष्ठ(मलपृष्ठ शब्द आवडत नाही)

प्रा.डॉ.गणेश चव्हाण यांचे शिक्षण,साहित्य योगदान,फलप्राप्ती(पुरस्कार)व त्यांच्या आगामी शब्दसृजनगंगेची ओळख करून देते.

अल्पशब्दातील अर्पणपत्रिका वंचित घटकाबाबतची तळमळ रेखांकित करते.

सदरहू कथासंग्रह हा बंजारा या भटक्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो.कथेत अनेक ठिकाणी बंजारा जमातीतील बोलीभाषेतील शब्दवापर असल्याने नवीन भाषाओळख झाल्याचा आनंद होतो.कथेसोबत बंजारा जीवनशैली,रिवाज,जीवन,जगणे,जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ,दूरदृष्टी दिसून येते.स्त्री जातीवर होणारा अन्याय,अत्याचार समाजात होणाऱ्या बदनामी,भविष्यात होणारी जीवनाची हेळसांड याचा विचार करून दाबून ठेवणे,मन मारून जगणे,सहन करणे ई. सर्व इतरही ग्रामीण जमातीतील दृष्टिकोन दिसून येतो.

.  कथासंग्रहातील 1 ली कथा -‘तांड्यातला येडा’ युवावस्थेतील भिन्नलिंगी आकर्षण,प्रेमभाव,त्या काळातील संभ्रम अवस्था,चलबिचल,व्यक्त होतानाचे भय इत्यादी

नैसर्गिक मनोवस्था दाखवते. ‘तांडेरो वेंडो’ नवीन शब्दाची ओळख होते.

‘एक कळी कुस्करलेली’सुरुवातीची लालित्यमय

भाषा लक्ष वेधून घेते.कथानक पुरुषी हैवानी वृत्तीपासून सुरू होते ती स्त्री जीवनाच्या लाचारी

,हतबलता येथे येऊन पोहचते.’याडी'(आई),

‘छोरी'(पोरी),’आपनो'(आपले)असे बंजारा बोलीभाषेतील शब्द कथेची श्रीमंती वाढवतात.

‘ढोंगी देम्या’ जुन्या  म्हणी,शब्दालंकार,  रितीरिवाज,सण,विवाह परंपरेची ओळख

दाखवते.’रोड्या’,’टांडरी'(बायको),’समनक'(धार्मिक विधी) या नवीन बोलीभाषेतील शब्द आनंद देत कथेतील आईवडील मुलांच्या हेकेखोर ,हट्टी स्वभावापुढे लाचार कसे होतात

हे दाखवते.

‘ खेळ भातुकलीचा’ मध्ये -नवलेरी वेतडू(भातुकली) चा खेळ खेळणाऱ्या निष्पाप

बालकांना ‘लग्न’नावाचा अर्थ ही माहीत नसतो.

लग्न हा आनंद की दुःख,स्वर्ग की नरक,यश की अपयश असे काहीही माहीत नसते.कधी कधी

तो पोरखेळ जींवनाचा ‘खेळ’ करून बसतो हे विदारक सत्य बघायला मिळते.

‘लग्न एक जुगार’ कथाही लग्न ह्या समाजसंस्थेतील अपयश दाखवत माणूस,

माणुसकी,मैत्री,विश्वास या शब्दांना तडा देते.

‘वनाई’ कथा मात्र बंजारा समाज,त्यांचा उद्योग,व्यवसाय,व्यापार,शेती,जीवनपद्धती,

वस्ती,तांडे,जगरहाटी याचे सुंदर चित्रण उभे

करते.तांड्यातील मुलामुलींचे खेळ-लगोरी,

विटीदांडू,मामाचे पत्र हरवले,डाबडुबली,न्हावी हजामत ई. बऱ्याच प्रांतातील खेळाचे साम्य दिसून येते.अशिक्षित आई मुलाच्या शिक्षणासाठीचा आग्रह धरून मुलाला ‘साहेब’

Bharkadi

करण्याची स्वप्न पाहते हे आशादायी परिवर्तन चित्रही पहायला मिळते.

…शीर्षककथा -‘भरकाडी'(माळरानावरचे  कोरडवाहू शेत) कथासंग्रह व कथा दोघांचा प्राण ठरतो. आज प्रत्येक समाजात शिक्षणाचा

पाया भक्कम करून त्यावर आपल्या आयुष्याची इमारत उभी करण्याचे प्रयत्न चालू

आहेत.व ही परिवर्तनाची नांदी आहे.कुठलेही मायबाप शेतीमातीत स्वतः राबून मुलांना शिकून स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी कंबर कसत असता अनेक अडचणींना तोंड देत यशपर्यंत पोहोचतात, तर काहींचा दुर्दैवाने उलटा प्रवास सुरु होऊन होत्याचे नव्हते झाल्याच्या घटना आपण रोज वाचतो, ऐकतो,

पाहतो.त्यावेळी जीव कापला जातो.

भरकाडी कथा ही हृदयाला चटका लावून जाते.

बंडूचे मामाच्या मुलीवर प्रेम,लग्नाचा मनोनिग्रह,पण शिक्षणानंतर नोकरी गरजेची.म्हणून आईवडिलांच्या निर्णय,समजुतीपुढे हार मानून संस्थाचालकाच्या मुलीबरोबर विवाह.पण…

मन जुळत नाही तेथे संसार जुळला नाही.

नोकरी,अप्रुव्हल,पैसा,दोन्ही कुटुंबाचे विकोपास गेलेले वाद, पत्नीने जाळून घेणे,सासऱ्याचा उलटा दावा,हुंड्यासाठी छळ,हत्याच्या आरोपाखाली संपूर्ण कुटुंबास अटक…..

शेवटी हतबल आईचे उद्गार……”आपली जीवनाची भरकाडी संस्थाचालकांच्या पैशाने,नोकरीने हिरवीगार करण्याच्या नादात

भरकाडीचीही भरकाडीच राहिली (वाताहात लागली)

“बेटा,स्त्रीमंताचे दोष पैशाने झाकले जातात…..

गरीबांचे नाही…..”

हृदय पिळवटून काढतात.

….’जगण्याने छळले होते’ मधील मंगू सामान्य माणूस ,बेरोजगार,हतबल शेतकरी,दीन जीवाचे प्रतिनिधित्व करतो.

फ्लॅशबॅक पद्धतीने कथानक पुढे सरकते. वाचक त्यात पुरता गुंततो.कारण त्यात कुठेतरी आपण,आपले मन,भावना,हतबलता,लाचारी,अगतिकता दिसून येते.

आशावादी,प्रयत्नशील मंगू कष्ट,संकटे,दुःख,परिस्थितीपुढे हार मानतच नाही.येणाऱ्या वादळाशी दोन हात करतोच.पण नियती पुन्हा पुन्हा त्याच्या हातातून सर्वस्व काढून घेते.मुलांचे पोट भरण्यासाठी परक्या ठिकाणी जातो अन मुलंच गमावून बसतो.

लाचार देह पुन्हा जगवतो. पण नियती त्याचा पाठलाग सोडत नाही.शेवटी नियती त्याचा

घास करतेच.कथेचा शेवट चटका लावून जातो.

प्रा.डॉ.गणेश चव्हाण यांच्या लेखनात त्यांचे सुक्ष्मनिरीक्षण,संवेदनशीलता,अवलोकन दिसून

येते.कथालेखनात संवाद असते तर कथाअजून खुलून आल्या असत्या.निवेदनशैली प्रभावी असल्याने ती उणीव भरून निघते. आदरनिय चव्हाण सरांच्या भावी लेखनवाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
अभिप्राय-लतिका चौधरी

दोंडाईचा

जि. धुळे
प्रमुख प्रतिनीधी.

रविराज एस. पवार

8976305533

www.GoarBanjara.com

 

Tag: Banjara News. Live Banjara