​बेघराला निवारा देण्याचा प्रयत्न, सौ. अश्विनीताई रविंद्र राठोड़, सोलापुर

बेघराला निवारा देण्याचा प्रयत्न
आज दिनांक 30-10-17 सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या मुलांना शाळा सोडण्यासाठी गेले होते.मोदी रेल्वे पुलाखाली एक 60-65 वर्षाचे वृद्ध आजोबा तेथे दिसून आले.त्यांना मी दिवाळीच्या आधी देखील तेथेच पाहिले होते.आज पण ते तिथेच होते त्यांची दुर्वस्था पाहून मन हेलावून गेले.या आजोबासाठी काही तरी करावे म्हणून मी मदतीचा हात पुढे केला.प्रार्थना फाऊंडेशन चे प्रसाद मोहिते सरांना फोन केला.मदत पाहिजे म्हणून तर सर अवघ्या 10-15 मिनिटांत हजर झाले.तसेच वसीम शेख सर यांनाही मी फोन करून मदत मागितली.प्रसाद सरांच्या माध्यमातून आम्ही त्या वृद्ध आजोबाला मदत करत असताना काही रस्तांनी जाणारी मंडळी ही मतद केली.त्यात दिपक वाघमारे सरांनी रिक्षा जाऊन आणले.त्या रिक्षातून आम्ही सोलापूर महानगरपालिका,नागरी समुदाय विकास प्रकल्प  (USD)दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत बेघरांना निवारा दिला जातो.तेथे त्या  वृद्ध आजोबाला घेऊन गेलो.फूटपाथावरील त्या वृद्ध आजोबाला आज आधार मिळाला.ही पोस्ट प्रसिद्धी साठी नाही आहे तर ही पोस्ट टाकण्या मागचा एकच उद्देश आहे की तुम्ही पण जेथे असे गरजूवंत दिसत असेल तर मदत करा.माणूसकी हात पुढे करा.

धन्यवाद प्रसाद सर.
सौ अश्विनी रविंद्र राठोड, सोलापूर

सौ. अश्विनीताई रविंद्र राठोड़, सोलापुर

प्रमुख प्रतिनीधी : रविराज एस. पवार