​सौ. आश्विनीताई राठोड यांचा विदर्भ दौरा(भास्कर नामदेव राठोड  (भासू)मुंबई /ठाणे.)

Ashwini Rathod Solapur
Ashwini Rathod Aswini Rathod
​सौ. आश्विनीताई राठोड

​सौ. आश्विनीताई राठोड यांचा विदर्भ दौरा
ताईसाहेब आपण एक महिला असुन आपल्या मध्ये असलेली समाजाबद्दल ची तळमळ व निर्मळ भावना म्हणजेच महाराष्ट्रभर आपण केलेला दौरा, पण सुरूवात मात्र आपली अन्यायाविरुद्ध व अत्याचारा विरूद्ध झाली,  मला आठवते ती नाशिकची घटना आणि सबंध महाराष्ट्रातील गोर बांधव आपल्याशी जोडला गेला आणि आपल्या कामाची पावती आपल्याला देत गेला,  मला आनंद या गोष्टीचा आहे की,  पुरुष तर समाजसेवेत सक्रिय सहभाग घेतच असतो पण जेव्हा महिलेच विषय येतो तेव्हा आकडेवारी ही बोटावर मोजण्या इतकीच मिळते, त्या मध्ये घरच्यांची लाभलेली साथ तसेच समाजाची साथ याचाच सांगड घालत आपण आज विदर्भ दौऱ्यावर जाऊन आले,

या संदर्भात बोलताना मला असे वाटते की,  कुठेतरी महिला देखील जागृत होताना आपल्या माध्यमातून दिसत आहे.  विदर्भ दौरा करत असताना आपण सर्वात पहिले आपल्या समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरागढ येथे संत सेवालाल महाराज यांचे दर्शन तसेच उमरीगढ येथील याडीचे दर्शन त्याच बरोबर निसर्गरम्य बनवण्यात आलेल्या भक्तीधाम तीर्थक्षेत्र भेट आणि मुंबई येथे आगामी काळात होणाऱ्या साहित्य संमेलन यांच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या *मा. आदरणीय जेष्ठ साहित्यिक व लेखक भिमणीपुत्र मोहन बापू* यांच्या निवासस्थानी भेट व विदर्भातील समाजसेवक यांची भेट घेऊन आपण आपल्या समाजाच्या विविध प्रश्न व  समाजाबद्दल आपली तळमळ दिसून येते,  आपण उचललेल्या महिला सबलीकरण व सक्षमीकरण या संदर्भात बोलावे तेवढे कमीच आहे.

त्याच बरोबर माझे मित्र मा. विशाल पवार यांच्या निवासस्थानी आपल्याला मिळालेला मानसन्मान व त्यांच्या परिवाराने दिलेला प्रेम हे तर मनाला आनंद देणारा आहे.

विदर्भ दौरा उल्लेखनीय राहीला ताई, समाजातील सर्व घटकांना आपण काही दिवसांपासून समाजामध्ये जनजागृतीचे काम करत आहात, महिलांना स्फूर्तिदायक ठरणार यात काही शंका नाही.

आपल्या कामाला यश नक्कीच प्राप्त होईल आणि महिलांना आपण दिशा देण्यासाठी सदैव तत्पर सेवा देत राहणार हा आशावाद मी व्यक्त करतो, आणि पुन्हा एकदा आपले  मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा .

Bhaskar Rathod Thane

भास्कर नामदेव राठोड  (भासू)

मुंबई /ठाणे. 8108024332.
प्रमुख प्रतिनिधि: रविराज एस. पवार

ऑनलाइन बंजारा न्यूज पोर्टल 8976305533

Website : www.GoarBanjara.com

 

Tag: Banjara Online News, Lamani, Lambadi News, Bazigar, Goaar News