कोई केनी भजो पूजो मत।

जय सेवालाल

कोई केनी भजो पूजो मत।
भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे।

रपीया कटोरो पांळी वक जाय।
भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल।

कसाईन गावढी मत वेचो।
भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा।

जिवते धंळीरो बीर घरेम मत लावजो।
भावार्थः जिवंत नवरा असणाय्रा स्त्री ला आपली बायको म्हणून घरात आणू नका।

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो।
भावार्थः चोरी करून खोट बोलून  पैसा कमऊ नक तथा तशा पैसा घरात आणू नका।

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो।
भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका

जाळंजो छाळंजो पछच मानजो।
भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा।

ये जो वातेर पत रकाडे ओन पाने आड पान तारलीम।
भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल।
श्री संत सेवालाल महाराज

संकलनः राजेश गुलाब आढे,
वाटूर तांडा ता: मंठा जि: जालना
  
माझ्या सेवाभायाचे विचार माझ्या गोर बांधवाना जरूर पाठवा। दररोज जोक पाठवता, आज एक विचार