मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात गेल्या 34 वर्षे पासुन मुंबई येथे कार्यरत असलेले नामदेव रूपसिंग आडे यांची ऐ.एस.आय पदी पदोन्नती झाली त्यांनी डि.एन.नगर पोलीस स्टेशन येथे रुजू झाले. नामदेव आडे यांनी खेरवाडी, जुहु, वाकोला, माहिम, बांद्रा, डि.एन.नगर ह्या सर्व पोलीस स्टेशनवर पोलीस हेडकॉन्सटेबल पदी कार्यरत असताना त्यांनी अतिशय कर्तव्यदक्षपणे कामे केली आहेत. नामदेव आडे यांचा सामाजिक चळवळीचा ही फार मोठ सहभाग असतो. त्यांनी बांद्रा येथे बंजारा समाजाची फार मोठी चाळ उभी केली आहे. त्यांच्या ह्या कार्युळे आज येथे एका बंजारा तांडय़ाचे स्वरूप आले आहे. त्यांच्या ह्या सामाजीक कार्युळे नामदेव आडे यांना मुंबईत बंजारा समाजातील तडफदार कार्यकर्ता म्हणुन ओळखले जाते.
नामदेव आडे यांनी मुंबईतील बंजारा कुटूंबाना आपल्या मुला-मुलीना खुप शिकवा असे सतत मार्गदर्शन करत आसतात. कारण नामदेव आडे यांची तिनही मुलं उच्चशिक्षीत आहेत. त्यांची मोठी मुलगी सौ.भारती आडे (राठोड) ह्या ऐक्सज्युटी इंजिनिअर पदी कार्यरत आहे. तर त्यांचा जावई सुनिल राठोड हा फॉरेन कंपनित जेमिनी येथे असिंस्टट ड्रॉयरेक्टर आहे. त्यांचा दुसरा मुलगा चि.रविंद्र आडे हा मुंबई हायकोर्टयेथे लिपिक पदावर कार्यरत आहे. तर सर्वात छोटा मुलगा चि.तुषार आडे (बी सिव्हिल इंजिनिअर) हा जिल्हा परिषद ठाणे येथे कार्यरत आहे. नामदेव आडे यांनी पोलीस विभाग अंतर्गत पी.एस.आय. पदाची परिक्षा पण पास केली आहे. लवकरच त्यांची पी.एस.आय. पदी पण पदोन्नती होणार आहे. त्यांच्या ह्या उज्वल कार्याबद्दल व पुढील पदोन्नती बद्दल सर्व मित्रवर्ग, व सा.बंजारा पुकार परिवार व बंजारा समाज बांधवांनी त्यांचे
अभिनंदन केले आहे.