18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं

18 ऑगस्ट, 2018

प्रति,
मा.विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / ——————,

विषय :- महाराष्ट्रातील गोर(बंजारा) जमातीच्या मागण्या व समस्या
तातडीने सोडविण्याबाबत.

मा. महोदय,
उपरोक्त विषयी सविनय नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील गोर (बंजारा) जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील गोर (बंजारा) ही जमात विकासापासून कोसो दूर असून अजूनही विषन्न अवस्थेत जगत आहेत. ते राहत असलेल्या तांडयात कोणत्याही पायाभूत सूविधा नसल्याने तांडेच्या तांडे विकसित व शहरी भागाकडे स्थलांतरीत होत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील तांडे आज ओस पडत आहेत.
गोर (बंजारा) जमातीच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे बुधवार दि. 18 मार्च, 2015 रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात मा. मंत्री सामाजिक न्याय यांचे अध्यक्षतेखाली दि. 19 जानेवारी, 2016 रोजी बैठक आयोजित केली होती. तद्नंतर आपल्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे दि. 08 फेब्रुवारी, 2016 बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र उक्त बैठक काही कारणास्तव पुढे ढकलली. आता संपूर्ण महाराष्ट्रातून गोर (बंजारा) जमातीच्या वतीने खालील प्रमुख मागण्या व समस्या आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
(अ) महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावयाच्या शिफारशी :
1. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला विविध नावाऐवजी गोर (बंजारा) या एकाच नावाने संबोधून लगतच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्याप्रमाणे संविधानिक सवलती व योजना लागू करावेत.
2. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. बापट आयोग व दादा इदाते आयोगाने केलेल्या शिफारशी मान्य करुन त्या केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावेत.
3. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीची सामाजिक, आर्थिक जनगणना/ सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद कराव्यात.
4. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी लागू केलेले ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करावे.
5. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीची भाषा गोरवाणी/गोरबोलीला संविधानाच्या आठव्या अनुसूचित समावेश करुन कर्नाटक राज्याप्रमाणे केंद्र सरकारकडे राजभाषेचा दर्जा मिळणेकामी पाठपुरावा करणा-या अभ्यास समितीची स्थापना करावी.
(ब) सामाजिक :
1. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला लागू केलेली “नॉन क्रिमिलिअरची” अट वगळण्यात यावी.
2. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला लोकसंख्या व अंतराची अट शिथील करुन 200
लोकसंख्या असलेल्या सर्व तांडयांना महसूली गाव दर्जा देण्यात यावे.
3. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमाती राहत असलेल्या तांडयाची लोकसंख्या व अंतराची
अट शिथील करुन किमान 500 लोकसंख्या व दीड कि.मी. अंतरावरील तांडयावर
ग्रामपंचायती स्थापन कराव्यात.
4. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गोर (बंजारा) असलेल्या जिल्हयात शासकीय वसतीगृह व तालुकास्तरावर “वसंतराव नाईक सामाजिक न्यायभवन” उभारण्यात यावे.
5. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना व सारथी योजना लागू करुन बार्टीच्या धर्तीवर “वसंतराव नाईक संशोधन संस्था” स्थापन करण्यात यावे.
6. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी रमाई आवास योजनेप्रमाणे “सामकीमाता आवास योजना” राबविण्यात यावे.
7. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीची जात पडताळणी व त्यातील अडचणी दूर करण्यासाठी राजपुत समाजाकडून अवैधरित्या बोगस प्रमाणपत्रे मिळविली असून त्या रद्द करण्यात याव्यात.
8. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीसाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर “संत सेवालाल तांडा विकास महामंडळाची” स्थापना करुन सध्याच्या व. ना. वि. जा. व भ. ज. महामंडळाच्या कार्यकक्षात वाढवून त्यावर भा.प्र.से. दर्जाच्या अधिका-याची नेमणूक करावी. व महामंडळावर गोर (बंजारा) जमातीच्या व्यक्तीची अध्यक्ष पदावर नेमणूक करुन भरीव निधीची तरतूद करावी.
9. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीच्या प्रतिनीधींची राज्य मागास आयोगाच्या सदस्य पदी व तांडा सुधार योजनेच्या अध्यक्षपदी कायमस्वरुपी नियुक्ती करावी.
10. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील उसतोड कामगार, नाका कामगार, मच्छी कामगार व महिला कामगारांची कामगार म्हणून नोंद करुन त्यांच्या मुलांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा पुरवून या कामगारांना पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने अल्प दरात महानगरात घरे उपलब्ध करुन द्यावीत.
(क) शैक्षणिक :
1. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व दर्जेदार शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करुन अल्प व्याजदरात शिक्षण कर्ज उपलब्ध करुन द्यावेत.
2. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील विद्यार्थ्यांना अ.जा. अ.ज. / आदीवासी विद्यार्थ्यांसाठी असणा-या वसतीगृह / आश्रमशाळेत 10 टक्के जागा राखीव ठेवाव्यात.
3. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी गोर (बंजारा) बहुल जिल्हयाच्या ठिकाणी S.I.A.C. च्या धर्तीवर स्पर्धा परिक्षा केंद्र स्थापन करावे. व यशदा, पुणे येथे प्रशिक्षणासाठी जागा राखीव ठेवाव्यात.
(ड) जमिनविषयक :
1. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीला वन पट्टे मिळावेत तसेच ते कसत असलेल्या जमिनीचे व तांडयात राहत असलेल्या जमिनींचे मालकी हक्क देण्यात यावे.
2. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील भूमिहिन व शेत मजूरांसाठी “वसंतराव नाईक स्वावलंबन योजना” राबवून 2 एकर जमीन देण्यात यावी.
(इ) सांस्कृतिक :
1. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील लोककलांचा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश करुन त्याचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीने लाखा गोर कलावंत योजना सुरु करुन त्यांना ओळखपत्र देवून प्रवास सवलत देण्यात यावी.
2. महाराष्ट्रातील गोर (बंजारा) जमातीतील गौरवशाली संस्कृती, समृध्‍द भाषा व उज्वल पोषाख परंपरा तसेच त्यांच्यातील वैभवशाली कला जोपासणे, ती टिकविणे व तीचे संवर्धन करुन जतन करण्यासाठी जागतिक स्वरुपाचे वस्तुसंग्रहालय व अकादमी (गोरमाटी धाटी, वाणी आन बानों अकादमी) स्थापन करावी.
उपरोक्त जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील सर्व मागण्या व समस्यावर आपण यथाशिघ्र बैठक आयोजित करुन त्या तातडीने सोडविण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे, अशी नम्र विनंती आहे.

आपले,

प्रत :- मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना
माहितीस्तव व यथोचित कार्यवाहीस्तव विनम्रतापुर्वक अग्रेषित

SECOND STEP
*थावर(शनिवार)ता.18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं,यी निवेदन मा.मंत्री,सारी आमदार आन संघटना येनूर सल्ला लेताणी देयेम आरो छं,कोयी ये निवेदने व्यतिरिक्त निवेदन नं देणू,निवेदन देतू वणा अघटीत न घडणू आन डपडा वजाते गजाते देणू!*????

*येक माटी कोटी गोरमाटी!*

*गोर वूटो डपडा कूटो!*

*नंघारा बंद डपडा सुरू,कान वघाडेरो काम सुरू!*

*गोरबंजारा वूटो नाय,हाक,आदेकारेसारू ढाटो!*

Tag : Gor Banjara letters to DM, Banjara letter to CM, Jai Sevalal, Banjara, Labana, Lambi, Baazigar, Gour, Gawaar, Gormati