
डॉ. गणेश चव्हाण सर लिखित ‘भरकाडी’ (कथासंग्रह)
“सामान्य जीवाचे तिमिरातून तेजाकडे जगणे आणि काळीज पिळवटून टाकणारा भावपूर्ण आलेख” लेखक-प्रा.डॉ. गणेश चव्हाण नागपूर भरकाडी या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके असून निळ्याशार भव्य आकाशातील ढग हे आशावाद दर्शवत असून शुष्क,खडकाळ जमीन , सर्वत्र वाळलेले गवत,आणि तरीही तग धरून उभे असलेले काही हिरवीगार झाडे झुडपे ही तेथील लोकजीवनाचे जगणे दर्शविते. अशा विपरीत वातावरण,परिस्थितीतही एक सुंदर,देखणी…