
लांबडी: कवी,एकनाथ गोफणे
लांबडी ………………………… हंगाम सरला फुलली लांबडी मंद मंद झुळुकावर डोलली लांबडी…. तिचा बाणा स्वाभीमानी पानं टोकदार उंच झेप घेण्यासाठी तिची आभाळी नजर…. मऊ सफेद झगा अन, गुलाबी धुंदी राना वनात फुलते लांबडी ‘ स्वच्छंदी ‘ गोधन पुजे मध्ये ‘छोरी ‘ देते तीला मान लांबडी गाते दोस्ता ताठ जगण्याचं गान… अशी फुलते लांबडी अशी डोलते…