राष्ट्रीय पुरस्काराने प्रा. कैलास राठोड सन्मानित

kailash-rathod
नांदेड (प्रतिनिधी): येथील प्रा. कैलास राठोड यांना दिल्लीच्या बाबु जगजीवन राम कला संस्कृती व साहित्य ऍकॅडमी या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरचा व प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘बाबु जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार’ 22 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी निवड झालेले प्रा. कैलास राठोड हे एकमेव मानकरी ठरले असून खाजगी शिकवणीच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय उभारणाचे भरिव कार्य ते गेल्या 20 वर्षापासून करीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाने 15 हजाराहून अधिक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल सदर पुरस्काराकरीता निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे आमदार हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल सावंत, जि.प. सदस्य भारतीबाई पवार, जि.प. सदस्य रोहिदास जाधव, साहेबराव राठोड चेन्नापूर, गुरुनाथ पेंढारकर, शंकर पवार मुखेड, रामदास जिरोणकर, गुलाब राठोड, जांभळी, गुलाब चव्हाण, चिदगीरीकर, जिवन चव्हाण, गणपत राठोड, आप्पाराव राठोड, दिगांबर राठोड, विठ्ठल जाधव, बालाजी जाधव, रामराव सूर्यवंशी, अशोक एडके, नंदकुमार बनसोडे, कोंडदेव हाटकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.