“जग जिंकण्यासाठी हवा दुर्दम्य आत्मविश्वास!
मित्र हो कितीही तनाव अयुष्यात येतात अन् जातात पण त्या तनावाला सामोरे जाण्याची जिद्द आपल्या अंगी हवी.जर आपल्या अगी ते तनाव पचविण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोनी ही रोखु शकनार नाही.सतत पुढे जाण्याची तयारी ठेवा.चांगले चांगले विचार आपल्या मनात असुद्या.मग बघा तुमची तयारी तुम्हाला चांगले येश देऊन जाईल.सधी सोडु नका संधीचा फायदा घ्यायला शिका हि संधी तुम्हाला दरवेळ मिळेल अस नाही.
स्वत:चा स्वत:च्या विचारांवर, कृतीवर, क्षमतांवर आणि निर्णयांवर असलेला विश्वास, म्हणजे आत्मविश्वास. कोणत्याही करिअरक्षेत्रात प्रगतीपथावर राहायचे असेल, तर आत्मविश्वास अत्यावश्यक ठरतो. आत्मविश्वासाच्या जोरावर क्षमता दुणावतात आणि यश मिळणे सुकर होते. परीक्षेतील किंवा नोकरीतील अपयश, आजारपण, आर्थिक संकट यामुळे निराश होऊन, आत्मविश्वास कमी होतो किंवा आत्मविश्वास हरवतो. ही गोष्ट व्यक्तीच्या प्रगतीसाठी मारक ठरते. या वर मात करण्यासाठी..आत्मविश्वासाची आवश्यकता * अचूक निर्णयक्षमता- दैनंदिन कामकाज किंवा जोखमीची कामे पार पाडण्यासाठी, निर्णय घेताना आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वत:च्या निर्णयांवरचा विश्वास अत्यावश्यक ठरतो. * विश्वासार्हता जपण्याकरता- प्रत्येक वेळी आपण स्वीकारलेली जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडल्याने, कामाचा दर्जाही राखला जातो आणि आपल्या कामाबद्दल इतरांची विश्वासार्हता वाढते. * क्षमतांचा पुरेपूर वापर- आत्मविश्वास, क्षमतांचा जास्तीतजास्त उपयोग करून घेण्यास प्रवृत्त करतो आणि अर्थातच याचा सकारात्मक परिणाम आपल्या कामगिरीवर दिसून येतो. * कामातील आनंद आणि समाधान- आत्मविश्वासातून योग्य ते काम स्वीकारण्याची आणि स्वीकारलेले काम योग्य तऱ्हेने पार पाडण्याची प्रेरणा मिळते. स्वत:ची कृती, निर्णयांबद्दल नि:शंक असण्याने कामातून समाधान आणि आनंदही मिळवता येतो. * स्वयंप्रेरणा आणि प्रोत्साहन- व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास हा आनंदी, कार्यक्षम आणि समाधानी मनोवृत्तीसाठी प्रेरक ठरतो. * सुसंवाद- प्रगती आणि यशस्वितेसाठी, कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक असलेला सुसंवाद, आपल्यातील आत्मविश्वासामुळेच साध्य होऊ शकतो. वर्तणूक आणि आत्मविश्वास * देहबोली- सुदृढ शरीरयष्टी, ताठ चालण्याची आणि बसण्याची पद्धत, बोलताना हातांच्या होणाऱ्या मोजक्याच, पण अर्थपूर्ण हालचाली या सर्व गोष्टी आत्मविश्वास संपादन करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. तेव्हा याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. * नजरेतून संवाद- वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी संवाद साधत असताना तुमची नजर समोरच्या व्यक्तीला बरंच काही सांगत असते. नजरेच्या भाषेतून व्यावसायिक संकेतांचे पालन व्हायला हवे. डोळ्यांची भाषा आत्मसात केल्याने आत्मविश्वास वाढतो. * स्वरोच्चार आणि आवाज – इतरांशी संवाद साधताना स्पष्ट उच्चार, आवाजाची संयत लय आणि पातळी या बाबी आपले व्यक्तिमत्त्व परिणामकारक बनवतात. * पेहराव आणि राहणीमान- स्वच्छ, नीटनेटका आणि डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगसंगतीचा पेहराव परिधान करणे आणि नेटकी राहणी या गोष्टीही आत्मविश्वासाच्या घडणीत महत्त्वाच्या ठरतात. आत्मसंवाद- स्वत:शी सतत संवाद साधल्याने आपला आत्मविश्वास उंचावतो. हा संवाद खालील प्रकारे होऊ शकतो- * मी हे करू शकतो/शकते याची वारंवार मनाला आणि मेंदूला सूचना देणे. * स्वत:तील सद्गुणांची, स्वत:च्या मनाशी सतत उजळणी करत राहणे. * आयुष्यातील आनंदी, यशदायी घटनाआठवून, मनाला प्रोत्साहित करणे. * या आधी आपल्या अपयशाला कारणीभूत ठरलेल्या चुका टाळण्याची मनाला ताकीद देणे. आत्मविश्वास उंचावण्यासाठी.. * ध्येय निश्चिती- अल्पकालीन, दीर्घकालीन ध्येयांबद्दल सुस्पष्टता असेल तर व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास दृढ होण्यास मदत होते. * ज्ञान- आपल्या अभ्यासविषयाशी किंवा कार्यक्षेत्राशी निगडित मूलभूत संकल्पनांचे सखोल आणि अचूक ज्ञान आपला आत्मविश्वास वाढवते. * वाचन- अनुभव संपन्नता आपल्यातील आत्मविश्वास वृिद्धगत करत असते, आणि यासाठी बहुश्रुतता, विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन, समकालीन आदर्श व्यक्तिमत्त्वांचे चरित्र वाचन, आघाडीच्या वृत्तपत्रांचे वाचन उपयोगी पडू शकते. * कार्यमग्नता- स्वत:ला सतत कोणत्या ना कोणत्या वैचारिक किंवा कलात्मक उपक्रमात गुंतवून ठेवल्याने, आपल्यातील सुप्त क्षमतांची आपल्याला नव्याने ओळख होते * निसर्गाचा सहवास – रोजच्या दैनंदिन धावपळीतून जाणीवपूर्वक वेळ काढून निसर्गात भटकंती, गिर्यारोहण, प्रस्तरारोहण अशा कोणत्या ना कोणत्या उपक्रमांतील सहभागामुळे व्यक्तिमत्त्वातील अनेक कौशल्यांचा कस लागतो, अनुभवात भर पडू शकते आणि असे अनुभव नक्कीच आपला आत्मविश्वास वाढवतात. * परिवर्तनशीलता- बदलत्या परिस्थितीनुसार घडणारे बदल, नवीन आव्हाने, नवीन तंत्रज्ञान, नवीन कार्यक्षेत्रे यांना सामावून घेण्याची परिवर्तनशील वृती मनापासून अंगी बाणवायला हवी. * स्वयंअभ्यास- आपल्या कार्यक्षेत्राशी निगडित विषयांची- सरकारी धोरणांची, नियमांची, कायद्यांची तसेच जिथे काम करत आहोत त्या संस्थेविषयी माहिती करून घ्या. संस्थेच्या आगामी योजनांची, प्रकल्पांची माहिती आपल्या कामाचा दर्जा आणि आपला आत्मविश्वास वाढवण्यास उपयुक्त ठरते. * शारीरिक क्षमतांचा विकास- शारीरिक क्षमतांची जपणूक व्यक्तीचे मन निरोगी ठेवण्यास आणि पर्यायाने आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. * छंदांची जोपासना- रोजच्या कामाव्यतिरिक्त फक्त स्वानंदासाठी, विरंगुळा म्हणून कोणत्या तरी छंदाची जोपासना मनाला आनंद देते आणि आत्मविश्वास वाढवते. हरवलेला आत्मविश्वास कसा मिळवाल?* प्रथम अपयश किंवा निराशेचे कारण शोधावे. * अपयशावर मात करण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांचे जाणीवपूर्वक नियोजन आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. * सद्य समस्येचा, काही काळासाठी त्रयस्थ नजरेतून विचार केल्याने समस्येचे विश्लेषण करणे आणि निराकरण करणे सोपे होते. * कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तसेच अनुभवी सहकाऱ्यांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांनी शिक्षक, अनुभवी मित्र, पालकांशी बोलून परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वेळीच पावलं उचलणं उपयुक्त ठरतं. * याआधी पूर्ण केलेल्या यशस्वी कामांबद्दल स्वत:बाबत अभिमान बाळगावा आणि यापुढेही असेच यश मिळवणे सहजशक्य आहे, असे सकारात्मक विचार सतत बाळगल्याने आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,व
संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था ठाणे.रजि./सेवादास वाचनालय सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ.