बंजारा समाजाची काशी (पोहरादेवी)
बंजारा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला एक वेळ पोहरादेवी येथे जावून संत सेवालाल महाराज, माता जगदंबा याडी, सामकी याडी चे दर्शन घ्यावे ही मनापासून ईच्छा असते. मी पोलीस खात्यात असतांना माझी बदली सन 2005 मध्ये वाशिम येथे झाली. रामनवमीला पोहरादेवी येथे बंजारा समाजाची फार मोठी यात्रा भरते. त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागतो. माझी पोहरादेवीला जाण्याची…