10 में रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब यांचा स्मृतिदिन आहे, या निमित्ताने अग्रोवन या दैनिकातील संग्रहीत लेख
जलक्रांतीचे बीजरोपन करणारे सुधाकरराव नाईक प्रा. दिनकर गुल्हाने दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून जलसंधारणाच्या कामांना गती देत राज्याला जलसमृद्धीची दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा स्मृतिदिन “जलसंधारण दिन’ म्हणून(10 मे) महाराष्ट्र शासन राज्यभर साजरा करते. यानिमित्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर…