“समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्या कडे जास्त महत्व दिल जातं”
समाज काय म्हणेल या गोष्टीला आपल्याकडे फार महत्त्व दिलं जातं … जेव्हा स्वतःसाठी काही करायला आपण जातो ना म्हणजे अगदी स्वतःसाठी जगण्याचा विचार जरी करत असू तेव्हा कित्येकांच्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय रहात नाही ‘ समाज काय म्हणेल?म्हणजे स्वतःसाठीचे कुठलेही निर्णय घेण्यासाठी आपल्याला समाज नावाच्या सर्वोच्च न्यायालयाहून देखील वरती असणाऱ्या संघटनेकडे डोळे लावून बसावे लागते….