चळवळीतला संघर्षयात्रीः हरिभाऊ राठोड – वाढदिवस विशेष – बंजारा पुकार

mla-haribhau-rathod

सामाजिक चळवळ ही निरंतर चालणारी एक समाजशील आणि संवदेनशील अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत स्वाभाविकच काही संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं तयार होतात, याला सृष्टीची एक जैविकस अवस्थाच म्हणावी लागेल. भारत वर्षात अनेक स्वातंत्र्यसेनानी जमात उदयास आली. त्यांनी मानवी हक्कासाठी आपले पुरुषार्थ देखिल गाजवले. परंतु यापैकीच काही जमाती मात्र पडद्याआड राहिली. कारण सामाजिक चळवळ जेवढी जीवंत, ज्वलंत आणि जाज्वल्य असते, तेवढेच त्या चळवळी अंतर्गत प्रकर्षाने येणार्या जमातीचा किंवा व्यक्तीचा इतिहास देखील गतीशीलल आणि शाश्वत असतो.Ex. MP Haribhau Rathod
परंतु काळाच्या ओघात परिघाबाहेर गेलेली क्षत्रिय बंजारा जमात ही देखिल खर्या अर्थाने एक स्वातंत्र्यसेनानी जमातच आहे. अशाच या इतिहासाच्या पडद्याआड राहिलेल्या न्यायवंचित परंतु स्वातंत्र्यसेनानी जमातीमध्ये हरिभाऊ नासरु राठोड सारखा एक कृतीशील कार्यकर्ता सामाजिक संवेदनेनी पुढे उत्क्रांत होत गेला. आणि मोठय़ा सामाजिक स्वप्नानी सामाजिक चळवळीची धगधगती मशाल त्यांच्या हातात आली. राजकारण आणि चळवळ एकाच नाण्याच्या दोन बाजू.फरक एवढाच की चळवळीमध्ये समाजनिष्ठा, पारदर्शकता आणि त्यागाला अधिक स्थान असते. सामाजिक उत्थानाचा ध्यास घेऊन एखादा ध्येयवेडा कार्यकर्ता चळवळीसाठी पुढे आला असेल तर प्रस्थापितांनी त्याचे स्वागत करायला हवे. परंतु तसे आज होत नाही. सामाजिक चळवळीमध्ये हरिभाऊचा जेंव्हा पदार्पण झाले तेव्हा अनेक संघर्षाला त्यांना तोंड द्यावे लागले. हरिभाऊच्या विरोधात अनेक कुटील रणनिती समाजातील काही प्रस्थापितांनी त्यावेळी उभारली होती. परंतु हरिभाऊ डगमगले नाही. कारण त्यांच्यातला सामाजिक बांधिलकीचा ध्यासच अधिक दुर्दम्य होता. पडद्याआड राहून हरिभाऊवर अनेकांनी वार केलीत. परंतु त्यांच्यातल्या सामाजिक धगासमोर ते सारे वार परतून गेले.

बंजारा चळवळीत त्यावेळी प्रामुख्याने रणजित नाईक, मखराम पवार, चंद्राम चव्हाण गुरुजी, प्रताप आडे, गजाधर राठोड, मनोहर नाईक सारखे धुरंधर कार्यरत होते. बहुजनकेसरी मखराम पवार यांनी ‘सारे बहुजन एक होऊ, सत्तेत सामिल होऊ’ असा नारा देऊन महाराष्ट्रात बहुजन महासंघाच्या रुपाने पहिल्यांदाच महावादळ निर्माण केले. आक्रमक व निष्कपट शैलीमुळे मखराम पवाराची सिंहगर्जना खूप चर्चेस आली. पुढे प्रकाश आंबेडकरासोबतच्या मतभीन्नतेवरुन व योग्य नियोजनाअभावी त्यांचा प्रयोग फसला. परंतु मखराम पवारांनी उत्क्रांत केलेली पॉवरफूल क्रांती आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय अभ्यासक व बहुजनासाठी दखलपात्र बाब ठरली शिवाय येथूनच खर्याअर्थाने ‘पवार इज पॉवर’ ही संकल्पना उदयास आली. जरी संकल्पना शरद पवरांमुळे जनमानसात दिल्लीपर्यंत प्रचलित झाली असेल तो भाग वेगळा. हरिभाऊ आणि मखराम पवार यांच्यातला शितयुद्ध जगजाहिर आहे. चळवळीत काम करणारे हे दोघेही कर्तुत्वान सेनानी. हरिभाऊंनी उदारतेनी मखराम पवाराला स्विकारले असते तर आजचा राजकीय समिकरण वेगळाच असता.

परंतु ते काळाला मान्य नसावे? मखराम पवार आणि हरिभाऊ यांच्यातल्या शितयुद्धाचा फायदा त्यावेळी अनेकांनी घेतला. हरिभाऊच्या सामाजिक जीवनातला हा संघर्षाचा पहिला पर्व होता. पुढे रणजित नाईकामुळे या संघर्षपर्वाला विराम मिळाले. रणजित नाईक हे एक कमालीचे कार्यक्षम व निस्वार्थी समाजकारणी होते. हरिभाऊच्या सामाजिक संघर्षाला पाहून त्यांना हुरुप येई. बंजारा क्रांती दलामुळे समाजात क्रांतीचे वारे वाहायला लागले. क्रांती दलाच्या माध्यमातून हरिभाऊ महाराष्ट्राच्या समाजकारणात पोहचले. त्यामुळे समाजाला नवे बळ मिळू लागले. क्रांती दलाचा चक्रीवादळ निर्माण करण्यात हरिभाऊच्या अथक परिश्रमाची दाद द्यावी लागेल. तेवढीच दाद प्राचार्य मधुकर पवार, राकेश जाधव आणि देविदास राठोडच्या सहकार्याला द्यावील लागेल. त्यावेळी हरिभाऊच्या मोर्चाला अनेक कार्यकर्ते उपाशी अनवाणी यायचे. आझाद मैदानावर त्यांच्यासाठी कित्येक गोर पाखराचे थवेच्या थवे भिरभिरले. कारण हरिभाऊमध्ये ती सचोटी, तळमळ आणि सामाजिक जाणीव होती.

चळवळीतले दुसरे पर्व … काँग्रेसला मानणारा सेवा संघ आणि भाजपाला मानणारा क्रांतीदल अशा दोन गटात चळवळ विभागण्याच्या मार्गावर होत्या. हरिभाऊचा नवा परिवर्तनवादी फॉर्म्यूला अनेकांना खटकणारा होता. oवास्तविक पाहता एकाच पॅनेलवर राहून समाजाला पुरेशे प्रतिनिधित्व मिळणार नाही ही हरिभाऊची प्रामाणिक भूमिका होती. परंतु हरिभाऊचा नवा ट्रेंड सेवा संघासाठी डोकेदुखी ठरणारा होता. हरिभाऊच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीच्या वार्यात युवापिढी त्यांच्याकडे आपोआप ओढल्या गेली. एक नवा जनसंग्राम हरिभाऊनी समाजात निर्माण केला. हा जनसंग्राम 1998 मध्ये पहिल्यांदाच आझाद मैदानावर धडकला.Haribhau-Rathod-family

तत्कालीन उपमुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे भारावून गेले. तेव्हाच हरिभाऊतला खंबीर नेतृत्व ओळखून त्यांची खाजगी सचिव म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. हा हरिभाऊच्या जीवनातला कलाटणी देणारा दुसरा पर्व म्हणावा लागेल. येथूनच खर्या अर्थाने हरिभाऊच्या कार्याला नवी धार, नव तेज मिळायला सुरुवात झाली. अनेक सामाजिक प्रश्नाची उकल व्हायला सुरुवात झाली. अनेक प्रश्न हरिभाऊनी मार्गी लावले. गोरगरीब जनतेसाठी हरिभाऊ धावू लागले. त्यामुळे हरिभाऊची लोकप्रियला व जनसंपर्क वाढत गेले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमामुळे हरिभाऊना यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे तिकीट मिळाली आणि उत्तमराव पाटील सारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करुन आपल्या नवा भगवा फडकविण्यात यशस्वी ठरले. बंजारा चळवळीतला, स्वातंत्र्यसेनानी जमातीच्या हा सर्वसामान्य कार्यकर्ता साखदार झाला. यापेक्षा दुसरे आनंद काय असू शकते? एकेकाळी क्रांतिदलाच्या आंदोलनावेळी आझाद मैदानावर स्वतः चटया उचलणारा, स्वतःच झेंडे, पोस्टर बांधणारा, तर कधी उपाशी- तापाशी प्रचार करणारा, स्वतःच्या छोटय़ाशा मुलाला घेऊन उपोषणालाही बसणारा. अनेक मान-अपमान सहन करणारा, समाजाचे प्रश्न घेऊन अनेकदा मंत्रालयाची पायरी झिजवणारा, दुर्लक्षित वचितासाठी धावून जाणारा गल्लीतला हरिभाऊ दिल्लीत पोहचला. ही बाब केवळ बंजारा समाजासाठीच नव्हे तर एकंदरीत सामाजिक चळवळीसाठी अभिमानाची बाब ठरली.

हरिभाऊ दिल्लीत पोहचले. समाजाला राष्ट्रीय स्तरावर एकजूट करण्यात जूळले. दिल्लीला पहिल्यांदाच केंद्रीय कृषीमंत्री मा. शरद पवार यांच्या उपस्थिती ‘बंजारा महापंचायत’ चे आयोजन करुन समाज राष्ट्रीय एकसंधता मजबूत करुन दिल्लीला बंजारा समाजाची नवी ओळख निर्माण करुन, दिली. जे बंजारा सेवासंघाला चाळीस वर्षात जमले नाही. ते हरिभाऊनी चार वर्षात करुन दाखवले. म्हणून हरिभाऊची जनमाणसात लोकप्रियता वाढली. येथूनच खर्या अर्थाने त्यांच्या सामाजिक जीवनाच्या तिसर्या पर्वाला सुरुवात झाली.

चळवळतले तिसरे पर्व … बंजारा समाजाची एकच संस्कृती असून वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुचित टाकून या समाजावर घोर अन्याय होत असल्याचे पाहून हरिभाऊनी पहिल्यांदाच तिसर्या सुचिची मागणी केली. लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेची मनधरणी करुन त्यांच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशातील 22 कोटी जनसमुदाय असलेल्या न्यायवंचित विमुक्त घुमंतुसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करायला लावली. या आयोगामुळे पहिल्यांदाच देशात या न्यायवंचित जमातीची वेदना पदेशापुढे आली. हेच या आयोगाचे एक यश मानावे लागेल. तिसर्या सुचीमुळे देशाचे सर्व राजकीय समीकरण बदलणार असे चित्र निर्माण झाले होते. मुलायमसिंग यादव, शरद पवार, लालू प्रसाद यादव आणि डावे या महाशक्तीला या विषयावर समर्थित बनवणे मोठे अवघड होते. एकदा नितीन गडकरीच्या वाडय़ावर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि हरिभाऊ राठोड चर्चेत रंगले होते. मध्येच तिसर्या सुचीचा विषय गोपीनाथराव मुंडेनी काढला. तितक्यात गमतीने प्रमोद महाजन म्हणाले, ‘बाप रे, तिसरी सूची लागू झाली म्हणजे हरिभाऊ तर 22 कोटी विमुक्त-भटक्याचे बाबासाहेब आंबेडकर झाले म्हणून समजा’ सारे जोर जोरात हसले, हरिभाऊ ही हसले. परंतु हरिभाऊच्या मनात शंकेची पाल तेव्हाच चूकचूकली. कारण या राष्ट्रीय आयोगाचे खरे प्रवर्तक हरिभाऊच होते. पुण्यात एकदा हरिभाऊच्या बाबतीत असा एक गमतीदार प्रसंग घडला. तेव्हा डॉ. जब्बार पटेलाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर बनविलेल्या चित्रपटाचा प्रिमीयर शो होता. प्रामुख्याने यावेळी गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते. त्या चित्रपटातील नायक आणि हरिभाऊच्या चेहर्यामध्ये बरेचसे साम्य असल्यामुळे शो संपल्यानंतर हरिभाऊकडे आश्चर्याने अनेक मंडळी बघत राहिली. तसं पाहता डॉ. आंबेडकरसारखं आपण दिसावं, अशी स्टाईल बनविण्याची त्यांना आवडच समजा.haribhau-rathod-family2

व्यंकट चलय्या आयोग बरखास्त करुन पुढे रेणके आयोगाची स्थापना करण्यात आली. रेणकेनी 2 शिफारशी अतिशय जाचक व गुंतागुंतीची असल्यामुळे प्रशासकीय वरिष्ठाना सरसकटपणे त्याच दृष्टीकोणाने इतर शिफारशीकडे पाहिल्यामुळे या आयोगाची शिफारस स्विकारण्यासाठी नकार घंटा वाजायला सुरुवात झाली. शिवाय सरकारला रिपोर्ट सोपवण्यापूर्वी मा. रेणकेनी किमान हरिभाऊसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी शिफारशी संदर्भात चर्चा देखील केली नाही. या घटनेला काय म्हणावे? सारे प्रश्न अनुत्तरीतच आहे. तिसर्या सुचिसाठी हरिभाऊनी जीवाचे रान केले. देशव्यापी जनजागरण केले. विमुक्त-घुमंतूसाठी देशात पहिल्यांदाच खाजगी विधेयक मांडणारा पहिलाच खासदार ठरला. हरिभाऊ संसदेत स्पिकरपुढे घसा कोरडा होईपर्यंत विमुक्तघुमंतूसाठी ओरडत राहिले. तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री मिरा कुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर हरिभाऊ शेवटी आसनस्थ झाले. शरद पवार, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, लालकृष्ण अडवाणी आदीचे मनं वळविण्यासाठी हरिभाऊ खूप झटले. संसदेसमोरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर देशात पहिल्यांदाच विमुक्त-घुमंतूसाठी सर्वपक्षीय 18 खासदारांना घेवून हरिभाऊनी निदर्शने केली. परंतु सारे प्रयत्न असफल ठरले. यामध्ये हरिभाऊच्या नेतृत्वाचा दोष नसून व्यवस्थेचा दोष आहे. याचवेळी भाजपच्या आतील गोटात हरिभाऊचे राष्ट्रीय राजकारणातील लोकप्रियता खपत नव्हती. त्यांची पक्षात घुसमट व्हायला लागली. हरिभाऊच्या सामाजिक जीवनातला जसा पहिला पर्व संघर्षमय होता. अगदी तसंच हा तिसरा पर्व उत्तरोत्तर त्यांच्यासाठी संघर्षमय होत गेला.

काँग्रेसमधील अहमद पटेल, मुकूल वासनिक आणि विलासराव देशमुख या ज्येष्ठ नेत्यांनी हरिभाऊना आश्वासित करुन आपल्या जाळ्यात अडकवले. युपीए सरकार तिसरी सूची लागू करणार अन माझे स्वप्न पूर्ण होणार. या आशावादाने हरिभाऊने कमळ सोडून पंजा हातात धरला. परंतु युपीए सरकारनेही हरिभाऊचे स्वप्न धुळीस मिळवले. काँग्रेसची तिकीट देऊन हरिभाऊनी काँग्रेसने गप्प बसवले. भावना गवळीची चिखलफेक, मजबूत कुणबी लॉबी आणि स्वकियांचा आतला विरोध यामुळे हरिभाऊसारखा कृतीशील कार्यकर्ता पराभूत झाला. हरिभाऊ राठोड हे राष्ट्रीय नेते म्हणून नावारुपास आलेले बंजारा समाजातील एकमेव व्यक्तीमत्व ठरणे. ही बाब मनोहरराव नाईक सारख्या ज्येष्ठ नेत्यांना नेहमी खटकणारी बाब ठरत होती. कारण बंजारा समाजाचे नेतृत्व इतर नेत्याकडे जाणे मनोहर नाईक सारख्या चाणाक्ष राजकीय नेत्यांना पटणारे नव्हते. हरिभाऊ पराभूत झाल्याची वार्ता कळताच तांडा अक्षरशः रडला.

तांडय़ात पेटलेले दिवेदेखील त्यादिवशी अंधारात दिसले. आमदार संजय राठोडचा भगवा बंजारा चळवळीतील  करण्यासाठी कधी पुढे आला नाही. जय सामकी याडी-जय वसंतराव नाईक हे कधी प्रतिबिंबीत झाले नाही. दारव्हा किंवा यवतमाळच्या एकाही मुख्य चौकात वसंतराव नाईकाचा पुतळा दिसत नाही. मनोहर नाईकानी कधी दुसर्याला पुढे जाऊ दिले नाही. जे त्यांच्या विरोधात गेले पुढे त्यांचेच झाले. ही नाईकाची रणनिती प्रशंसनिय आहे. परंतु त्यांनी पुसदलाच महाराष्ट्र समजले. जर महाराष्ट्राला पूसद समजले असते तर आज महाराष्ट्रात मराठय़ानंतर बंजाराचा प्रभाव असता. हे शल्य हे अक्रोश ही वेदना कित्येक तांडय़ातून आजही अज्ञाग ओकत आहे. हे तेवढेच वास्तव. कुठलेही राजकीय वारसा नसताना तळागाळातला चळवळीतून पुढे आलेल्या हरिभाऊनी काहीच केले नाही, ते केवळ संधीसाधू नेते आहे. या भावनेनी त्यांच्या कार्याचे मुल्यमापन करणे चुकीचे ठरेल. महानायक वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे, मी मुंबईत मंत्रालयात असलो तरी देखील माझे भान शेतीच्या बांधावर राहते, अगदी तसच हरिभाऊ दिल्लीत गेल्यानंतरही त्यांचा वेध गल्लीतल्या न्यायवंचित, उपेक्षित जीवन जगणार्या कडेच होते. त्यामुळे हरिभाऊ ‘दिल्लीतला हरिभाऊ गल्लीत आला’ असे उपरोधिक टिका करणे उचित नाही. त्याची नाळ गल्लीशी होती व आहे. पराभूत झाले म्हणून काय झाले? राजकारणात तर ते हार-जितचा लपंडाव चालणारा असतो.

केजरीवालच्या लाटामुळे भाजप आणि काँग्रेसने आपली रणनिती 16 व्या लोकसभेची पुर्णपणे बदलविली. नवा चेहरा देण्याच्या कारणावरुन हरिभाऊचा 16 व्या लोकसभेची तिकीट रद्द झाली. तरीपण त्यांचे राष्ट्रीय वलय पाहता राज्यसभेवर पाठवण्याचे धाडस त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, मुकूल वासनिक व माणिकराव ठाकरे यांनी केले नाही. परिणामी विधान परिषदेची माळ हरिभाऊच्या गळ्यात घालून त्यांनी शांत बसवले. एकेकाळी दिग्रस मतदार संघातून हरिभाऊची अनामत रक्कम जप्त झाली होती. परंतु आज मात्र त्यांना सन्मानाने आमदार बनवल्यामुळे त्यांचे आमदाराचे स्वप्न पूर्ण झाले. 1995 पासून चळवळीसाठी सक्रियपणे हरिभाऊ झटत आले. व्ही.जे. एन.टी. स्वतंत्र मंत्रालय, तांडा वस्ती योजना, मुंबईमधील निर्वाविताना आधार, पोहरादेवीला पर्यटनाचा दर्जा, वस्तीगृहातील व्हीजेएनटी विद्यार्थ्याच्या आरक्षणात वाढ याशिवाय सर्वसामान्य जनतेचे कितीतरी प्रश्न सोडवले. चळवळ जीवंत ठेवण्यासाठी जे प्रयत्न रणजित नाईकानी केले.

त्यापेक्षा करीत आले. रणजित नाईक म्हणायचे, ‘हरिभाऊ म्हणजे सर्व सामान्यासाठी झटणारा, अदभूत शक्ती असणारा एक भला सज्जन माणूस होय’ आज चळवळीसाठी झटणारे नेते फार कमी उरले. हरिभाऊनंतर चळवळीचे काय होणार? असा सतत प्रश्न भोडसावतो. निसर्ग नेहमी नवीन नेतृत्व तयार करुन ठेवतो. हे जरी सत्य असले तरीदेखील हरिभाऊची जागा मात्र कोणीही घेऊ शकत नाही. साहित्यिक एकनाथ पवार नागपूर लिखित हरिभाऊ वरील दीपस्तंभ मुळे हरिभाऊला चळवळीत व जनमाणसात मोठे वलय निर्माण करता आले हे जरी सत्य असेल, परंतु त्यांचा 20 वर्षाचा संघर्षाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मोर्चात किती लोक होते, याची विचारणा करण्यापेक्षा आपण कितीदा समाजासाठी मोर्च्यात सामिल झालो हे देखील हरिभाऊच्या टिकाकारांनी लक्षात घ्यायला हवे. समाजाच्या वेदनाचे भान, वैचारिक प्रगल्भता आणि सामाजिवकउत्थानाचा मेनिफेस्टो हरिभाऊच्या नसात आहे. महानायक वसंतराव नाईकानी मुहूर्तमेढ केलेली ही चळवळी जीवंत रहावी यासाठी हरिभाऊने उपसलेले संघर्ष आणि त्यांनी केलेला त्याग येणार्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. त्यांच्या एकसष्टीला मनापासून शुभेच्छा, ईश्वर दिर्घायुष्य देईल ही शुभकामना.

एकनाथ पवार
लेखक सामाजिक चळळीचे विश्लेषक
असून विदर्भातील नामवंत साहित्यिक व समीक्षक आहेत.
मो. 9850131368

 

Tag: Ex MP Haribhau Rathod History Job Profile, Biography