गोरबंजारा लोककलावंताना मिळणार शासनाच्या सुविधा

Banjara Lok kala Mahotsav Gor Banjara

बुलढाणा दि.१ मार्चे,२०२० : महाराष्ट्र शासनाने २०१९ या वर्षीपासून गोर बंजारा लोक कलांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश केला असून गोरबंजारा कलावंतांना कलावंत मानधन योजना सुरू केली आहे,त्याची सुरूवात म्हणून निलेश राठोड मित्रमंडळाने पुढाकार घेत देवानगर ता लोणार जि बुलढाणा येथे रविवार दिनांक ८ मार्च,२०२० रोजी या महोत्सवाचे आयोजन केले आहे,या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यावा व ईतर कलावंताना अवगत करावे,गोरबंजारा लोककलांचे जतन,संवर्धन व प्रसार करण्यास साहाय्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Banjara Lok kala Mahotsav Gor Banjara

या महोत्सवात कलावंतांचा सत्कार करण्यात येणार असून महिला व पुरुष प्रत्येकास प्रथम १०,००० दूसरा ७०००,तीसरा ५००० चौथा ३००० पाचवा १००० तर उत्तेजनार्थ चार पारितोषिक देण्यात येणार आहेत पुरष्काराचे
स्वरूप:- रोख रक्कम, प्रमाणपत्र,ट्राॅफी व स्मृतीचिन्ह असे आहे

कार्यक्रमाचे
मार्गदर्शक:- मा.ना.श्री.संजय राठोड,मंत्री-वने,भूकंप पुनर्वसन

उद्घाटक-मा.ना.डाँ.राजेंद्र शिंगणे,मंत्री अन्न व औषध प्रशासन, पालकमंत्री बुलडाणा.
उद्घाटन
वेळ व दिनांक:- रविवार ८ मार्च,२०२०*
सकाळी-१० वा उद्घाटन
११ ते ४ कार्यक्रम (वेळेवर यावे)
सायं-५ वा बक्षिस वितरण/समारोप
सायं -७ वा नंतर समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल यांचे प्रवचन व व्यसनमुक्तीवर कार्यक्रम होईल

स्थळ:- आई,भाया,गुरू संस्थान देवानगर,ता लोणार जि बुलढाणा

कलाप्रकार:- लेंगी,होळी गीत,तीज गीत,दवाळी गीत, बेठी, पायी, भजन,शाहीरी,कलापत, फागण,डफडा गीद ई.

विशेष सुचना:- उपरोक्त पात्र कलांवतांमधून ज्येष्ठ कलावंतांची मानधन योजनेसाठी निवड करण्यात येणार असून येताना ३ फोटो,आधार,रहिवाशी व बॅंकेचे पासबुक यांच्या झेराॅक्स प्रती सोबत आणाव्यात.

नियम व अटी:-
१)उपरोक्त कलाप्रकाराव्यतीरिक्त अन्य प्रकारास आयोजकांची संमती लागेल तसेच सर्व साहित्य संबंधीतानी आणावेत.
२)ड्रेसकोड- सहभागी कलावंतांनी गोर बानों/पेहराव घालून यावे,अन्य पोशाख असल्यास पात्र राहणार नाहीत.
३)दोन्ही गटात किमान ५ व जास्तीत जास्त २० सदस्य असावेत.
४)प्रत्येक कला सादरीकरणास किमान १० तर जास्तीत जास्त २० मी असतील अपवादात्मक परिस्थितीत आयोजक ५ मी वाढवू शकतील,किंवा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल.
५)एकदा सहभागी कलावंतास गट फोडून अन्य गटात सहभागी होता येणार नाही.
६)कलाप्रकार किंवा गीत गायनाची पुनरूक्ती टाळावीत वेगळ्या प्रकारे सादरीकरणास आयोजकाची संमती लागेल.
७)दारू पिऊन,भांड लेंगी,आक्षेपार्ह गीत वा हालचाल अपात्र केली जाईल तथापि निर्णयाबाबतचे सर्व अधिकार व अंतीम निर्णय आयोजकांचे राहील.

परिक्षक:- निर्णय प्रक्रियेत गोपनीयता राहावी यास्तव ही नावे केवळ कार्यक्रमस्थळी घोषीत करण्यात येईल.परीक्षण पारदर्शी राहील तथापि कोणी हस्तक्षेप करणार नाही.

पंच:- लोणार व सिंराजा तालुक्यांतील सर्व तांड्याचे नायक व सरपंच

आयोजक:- निलेश राठोड मित्र मंडळ तथा कर्मचारी मंडळ

प्रकाशक:- समस्त ग्रामस्थ देवानगर,कि जट्टू

टिप:- सहभागी कलावंतांसाठी जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जाईल
सदर कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

 

Tag: Gor Banjara Artist, Banjara Kalakar, Minister Sanjay Bhau Rathod, PA Nilesh Prabhu Rathod, Banjara Holi Lengi Compitition Mahotsav, Ex CM Vasantrao Naik, Sant Sevalal Maharaj, Sant Ramrao Maharaj