नांदेड (प्रतिनिधी): देशातील 11 राज्यातील बंजारा समाजाच अभ्यास दौरा करुन अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव प्राचार्य मधुकर पवार आल्यानंतर त्यांचे प्रवासवर्णन व बंजारा समजाबाबतच अनुभव त्यांनी व्यक्त केले. बंजारा समाजाची उत्पत्ती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत वर्षात विखुरलेला बंजारा समाज त्यांच्या उत्पत्तीचे विशेष आकर्षण देशातील बंजारा समाजाला आहे. बंजारा ही जाती राजस्थान मेवाडची मूल निवासी आहे. 16 व्या शताब्दीच्यापूर्वी बंजारा बाजीगर नावाची कुठलीच जात नव्हती.
16 व्या शताब्दीमध्ये जेव्हा मुघलांनी चित्तोडगड किल्ल्यावर आक्रमण केले आणि महाराणाप्रताप यांची हार झाली. तेव्हा महाराणा प्रताप आपल्या वाचलेल्या छोटय़ाशा सेनेसोबत जंगलात लपले. तेव्हा त्यांची तब्येत खुपच खराब झाली. त्यांनी आपल्या सेनेतील योध्यांना सांगितले, ‘की माझी प्राण सोडण्याची वेळ झाली आहे. तेव्हा माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे तुम्ही प्रयत्न कराल की मेवाड तुमचा आहे आणि एक दिवस चित्तोडगड किल्ल्यावर आपला झेंडा फडकवाल तेव्हा माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तीच मला खरी श्रद्धांजली ठरेल.’ त्यावेळी बंजारा समाजातील बाबा लालदास गौड जे राज पुरोहित व राजवैद्य होते. त्यांचेकडे महाराणा प्रताप त्यांना आणले. त्यांचे उपस्थितीत त्यावेळी बंजारा समाजातील योद्धांना शपथदिली की, आम्ही तोपर्यंत गप्प बसणार नाही जोपर्यंत चित्तोडगड किल्ल्यावर आमचा झेंडा फडकवणार नाही. तेव्हा महाराणा प्रताप यांनी बंजारा समाजातील योद्धांना खालील सात प्रतिज्ञा दिल्या. आम्ही आमची जात आणि वंश कोणलाही सांगणार नाही, कारण मोघल आपल्याला ओळखायला नको. आम्ही स्वतःचे घर बनवून राहणार नाही, आमच्या त्रीया काचाच्या बांगडय़ा घालणार नाही. बाजेवर आम्ही झोपणार नाही. आम्ही काशाच्या भांडय़ात जेवणार नाही. बाहेरच्या आदेशाला आम्ही स्वीकारणार नाही, गादीवर व रजईचा उपयोग करणार नाही. या प्रतीज्ञेनंतर महाराणा प्रताप यांनी प्राण सोडला. तेव्हा उपस्थित योद्धांमधील राठोड, पवार, बगीचा, तूर, बंजारा पंडित, लालदास गौड, सारख्यांनी आपआपल्या परिवारातून निघून भारताच्या विभीन्न राज्यात जेथे जेथे बंजारा समाज आहे तेथे गेलेत. त्यामध्ये हरियाणा, पंजाब, जम्मू, नुरपूर रियासत, निजाम रिंयासत तसेच देशातल्या प्रत्येक कोण्यात जाऊन वस्ती, वाडी, तांडे फिरत रोजी रोटीकरिता विभीन्न साधने गोळाकरत बैलगाडीवर आपले सामान लादून भारतभर फिरले. तेव्हा त्यांना गडरीया जात म्हटल्या गेले. जे कसबे, कबीले, भेडबकरी पाळण्याचे काम करीत त्यांना भेडकोट म्हटल्या जात होते.
तसेच जे कबीले खडकविक्री शिरडीया बनवून विकू लागले त्यांना शिर्लीबन बंजारा जातीच्या नावाने ओळखले जाऊ लागले. काही कबीले हत्यार, तलवार, भाले बनवित आणि लोखंडाच्या भांडय़ाची दुरुस्ती करीत त्यांना शिकलीकार संबोधल्या गेले, जे कबीले छोटय़ा मोठय़ा उपयोगी वस्तू विकूण आपले पोटभरण्याचे काम करु लागले त्यांना बंजारे संबोधल्या जाऊ लागले. महाराणा प्रतापचे भाऊ शेषमल वंशज म्हणून त्यांना शिशोदिया म्हणून ओळखू लागले. जेव्हा बंजारा पंडीत लालदास गौड वंशाचे बाजीरग कबील्यातील लोक मुख्यतः हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्यात नुरपूर रियासतमध्ये जावून वसले. आजही, नुरपूरचा राजा दिग्वीजयसिंह तोमर, राजपूत आहेत. काही दिवसानंतर मी त्यांना ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या अधिवेशनात जरुन आणणार आहे. आजही कमलनयान गौड, गुरुदास गौडचे वडील रामलखा जे 2000 ते 2005 पर्यंत कांगडा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राहिले आहेत. जे बंजारा आहेत त्यांना तोर राजाने वारंवार सांगितले, की मी बंजारा आहे. नुरपूरचे राजा राजपूत आणि बाजगीर या दोन्ही जातीच्या नावाने ओळखल्या जातात. आजही बंजारा समाजातील या योद्धांच्या समर्पणावर जगातील शिख समुदाय गर्व करतोय. त्याची स्मृती ताजी करण्यासाठी जेव्हा औरंगजेबाने गुरु तेगबहादूरसिंह ह्यांचे धड तलवारीने चांदणी चौक दिल्लीमध्ये वेगळे केले.
तेव्हा भाई मनीसिंह कसरा लख्खी शहा बंजाराने आपल्या 100 साथीदारांसह वादळाची पर्वा न करता आपल्या गाडीतून शरीर आणि धड उचलून आणले. जेथे आज दिल्लीमध्ये संसद भवन आहे. संसदेपासून 50 फूट अंतरावर रकाबगंज गुरुद्वारा आहे ती जागा रायसिन्हा नायकाचा तांडा जिथे होता तिथेच लख्खी शहा बंजाराने आपले घर जाळून गुरु तेग बहादूर सिंह यांच्या धडाला अग्नी दिला. तिथेच आज रकाबगंज गुरुद्वारा आहे. त्यालाच लागून शिख समुदायाने विशाल लख्खी सहा भवन बांधले आहे. जेथे शोधकर्ता मधुकर पवार यांच्या नेतृत्वात रकाबगंज गुरुद्वारापासून विशाल मोर्चा निघाला होता. याप्रकारे बाजीगर बंजारा कबिल्यांचा इतिहास गौरवशाली आहे. आजही येणारी प्रत्येक पिढी यावर गर्व करेल आणि सांगेल आम्ही विस्थापित राजपूत महाराणा प्रतापांचे योद्धा बाजीगर आहोत. राजस्थानमधून आलेली ही सैनिकी जमात 350 वर्षांपर्यंत परिस्थितीशी झगडत आर्थिक सामाजिक, शैक्षणिकदृष्टीने दिवसेंदिवस मागासलेली होत चालली आहे. जीवनाच्या धावपळीत ही जात संपूर्ण भारतात खूप मागे राहिली.
सन 1924 मध्ये काँग्रेस सरकारने ट्राईब ऍक्ट पास करुन या समाजाला विशेष सेवा व सवलती देत विकासाची घोषणा केली. परंतु या समाजाने इंग्रज सरकारद्वारा दिलेल्या सवलती नाकारल्या. तसेच एका जाग्यावर स्थिर न राहणार्या या समाजाने कुठल्याही प्रकारचा लाभ घेतला नाही. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यांनतर 1952 पर्यंत भारतीय संविधानुसार हा समाज वेगवेगळ्या जातीनुसार ओळखल्या जात आहे. परंतु 1952 मध्ये भारत सरकारने क्रिमीलीयर टाईम ऍक्टला संविधानाने करून आणि विशेष स्वरूपात भारताचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी या समाजाच्या इतिहासाची जाणिव ठेवली होती. त्यांनी भारत एक खोज या पुस्तकांमध्ये बंजारा समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. मी जेव्हा 26 मे 2010 ला राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये होतो. त्या जयपूर शहराच्या मधोमध बंजारा योध्दाच्या लढाईत कामात येणार्या रात्रीच्या व्यवस्थेमधील किल्ल्याचे नाव आहे. हरदोई किल्ला. त्या किल्ल्याचे मठाधिपती बंजारा समाजाचे बाबा सितारामदासजी महाराज तेथे विराजमान होते. या किल्ल्याची महाराणीला भेटण्यासाठी भारताचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु भेटण्यासाठी येत होते. तसेच श्रीमती इंदिरा गांधीसुद्धा या किल्ल्याच्या महाराणीला दरदिवशी टेलिफोनने हितगूज करीत असत. पंडित नेहरु यांनी 1962 मध्ये या समाजाच्या प्रमुख सरदारांना बोलावून त्यांच्या समाजाबद्दल जाणून घेतले. अन 1962 मध्ये संपूर्ण बंजारा समाजाचे संमेलन चित्तोडगड किल्ल्यावर घेतले. त्यावेळी महाराणा प्रतापांनी प्राण देताना बंजारा समाजाला दिलेल्या प्रतिज्ञांमधून भारत देश स्वतंत्र झाल्यामुळे आपण मुक्त झाला आहात, अशी घोषणा केली आणि हा चित्तोडगड किल्ला सर्व बंजारा समाजाला सुपूर्द करण्याची घोषणा केली. तेव्हा महाराणा प्रतापांच्या सातही प्रतिज्ञामधून बंजारा समाज मुक्त झाला आणि आज बंजारा समाज भारतात विभिन्न प्रांतात विखुरलेल्या गेला आहे. आजही 50 वर्षानंतर त्या घटनेच्या स्मृती ताज्या होत आहेत.