बंजारा समाजाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तेलंगाणा सरकारला सांगू तसेच संत सेवालाल जयंतीस मान्यता देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन ना.राठोड व आमदार हरिभाऊंची मध्यस्थी यशस्वी
नागपूर:दि.22 डिसेंबर,2017 तेलंगणा ह्या राज्यात गोर-बंजारा / लंबाडा ही जमात अनुसुचित जमाती प्रवर्गात असून त्यांना ह्या सवलती मिळू नये म्हणून आकसापोटी व षडयंत्र रचून गोंड व कोया/कोलामा ह्या आदिवासी जमातींकडून दि.15 डिसेंबर, 2017 रोजी जैंनुर ऊत्नुर व ईंद्रनेली जिल्हा आदिलाबाद, तेलंगाणा येथे हिंसाचार घडविण्यात आला, त्यामध्ये 5 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले….