प्राचार्य मधुकर पवार (Madhukar Pawar) यांना पी.एचडी.-

Madhukar-pawar

नांदेड (प्रतिनिधी): स्थानिक गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शिटाकळी जि. अकोला चे प्राचार्य, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय महासचिव, विमुक्त व भटक्या जमाती महासंघ नवी दिल्ली तथा प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मधुकर पवार यांना विक्रम विद्यापीठ उज्जैन (मध्यप्रदेश) ने, ‘उज्जैन जिल्हे के आर्थिक विकास में बंजारा समाज का योगदान’ या विषयावर पी.एच.डी. डिग्री देवून सन्मानित केले. ड ा ओ . ए च . ए न . माहेश्वरी, माधव कला, वाणिज्य महाविद्यालय उज्जैन यांनी मार्गदर्शन केले. पी.एच.डी. करण्यासाठी डॉ. सोनी, अधिष्ठाता, वाणिज्य शाखा विक्रम विद्यापीठ उज्जैन, डॉ. प्रेमलता चुटैल, डीन, हिंदी शाखा विक्रम विद्यापीठ उज्जैन यांचे विशेष सहकार्य लाभले. मधुकर पवारांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व सहकार क्षेत्राशी संबंध आलेला आहे. ते अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांनी उज्जैन जिल्ह्यासोबतच मध्यप्रदेशातील 50 जिल्ह्यातील बंजारा समाजाचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे.Madhukar-pawar

त्यांनी भारतातील 29 राज्य व 7 केंद्रशासीत प्रदेशात फिरुन संपूर्ण देशभर प्रत्येक राज्यात प्रत्यक्ष जावून त्या त्या राज्यातील बंजारा समाजबांधवांचा अभ्यास केलेला आहे. भारतातील 26 राज्य व 4 केंद्र शासित प्रदेशात प्रत्यक्ष जावून तेथील बंजारा समाजाचा सखोल अभ्यास करणारे 5 कोटी लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजातील एकमेव मधुकर पवार आहेत. म्हणून देशातील सामाजिक व राजकीय खेत्रात काम करणारे बंजारा समाजातील नेते व कार्यकर्ते बंजारा समाजाची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक राज्यातील बंजारा बांधव त्यांच्याकडून फोनद्वारे माहिती मिळवितात. संशोधन कामांना विद्ववान व्यक्तिंना ते नेहमी मदत करतात. म्हणून देशातील एकमेव बंजारा समाजाचे ‘बाबुसिंग राठोड बंजारा अभ्यास केंद्र’ ते बार्शिटाकळीला चालवितात. त्यांच्या या यशाबद्दल ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. एम. शंकर नायक, कार्याध्यक्ष माजी मंत्री मखराम पवार, माजी मंत्री मनोहरराव नाईक, उपाध्यक्ष माजी मंत्री अमरसिंह तिलावत (तेलंगना), चंद्रकला नाईक, खा. हरिभाऊ राठोड, संस्थेचे सचिव किसनराव पवार, मधुकरराव पवार कला महाविद्यालय मूर्तिजापूर जि. अकोलाचे प्राचार्य वि.वि. सपकाळ, बार्शिटाकळीचे उपप्राचार्य आर. आर. राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर.पी. राठोड, कार्यालय अधीक्षक एन.एन. राऊत, जनुनाचे मुख्याध्यापक प्रा. एन.डी. शिंपी, यु.एम. भड, पिंजरचे मुख्याध्यापक प्रा. एस.टी. चव्हाण, सौ. छाया रविंद्र राठोड, गेनीबाई पवार, कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ. शाहिस्ता परवीन तसेच दोन्ही महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेच्या सर्व कर्मचार्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांचे अभिनंदन केले आहे.