“धरती तोपर आंबर नहीं कोई,
आंबर रहे चांदा न सूरीया,
नवलख तारा वोर साथ चले,
धरती तोपर भाई भाईरं!”
असे म्हणत गोरमाटी [गोर(बंजारा)] ही जमात जगत,वागत,संदेश देत आलेली आहे,ह्या जमातीने जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली जगण्यावागण्याची रीत तयार केली त्या विचारशैलीवर चालणारी ही एकमेव जमात,ह्या जमातीने अनेक छोटेमोठे समाजघटक आपल्या टांढा रचनेत सोबत घेत बदलता काळ,परकीय आक्रमणे व राज्य देश व त्याच्या कायद्याचे रक्षण करत कधी लदेणी व्यापार,कधी राज्य तर कधी स्वकीयांच्या द्वेषामूळे भटकंती करणारी ही जमात तशी संसार आणि कर्तव्याला महत्व देत आलेली आहे मात्र ऊज्वल परंपरा,गौरवशाली ईतिहास आणि स्वाभिमानी स्वभावाची ही जमात इंग्रजांचे जुलमी कायदे,देशाराज्यांच्या सिमा व बदलते वातावरण यांमुळे प्रचंड हालाकीत जगत होती,आपली उपजीविका करण्याचे त्यांचे लदेणी,व्यापार व स्वयंपूर्ण असणारा टांढा उध्वस्त होत होता,लोकांमध्ये न्यूनगंड व स्वाभिमान हरवत जात होते अशा परिस्थितीत गोरमाटीची धाटी प्रथापरंपरा थोडीशी बाजूला करत सेवालाल महाराज हे ब्रमचारी झाले आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य हे ह्या जमातीला ईतर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आतोनात प्रयत्न केला,त्यांच्या कार्याला यशही मिळाले म्हणून लोक त्यांना कोर गोर,गोरगरिबांचा सतगरू म्हणजे सत्याच्या मार्गावर चालवणारा म्हणून संबोधू लागली,आपला गतवैभव प्राप्त करण्यासाठी ही जमात पून्हा सारे विसरून झटून कामाला लागली आणि त्यांनी पुन्हा देशांतर्गत लदेणीच्या रूपाने छोटेमोठे व्यापार सुरू केले त्यात मिठ व अन्य अन्नपदार्थ,सैन्याला रसद व देशांतर्गत उपयुक्त साहीत्यांची लदेणी सुरू केली मात्र ही बाब ईंग्रजी राजवट व काही जूलमी राजवटींना खटत गेली आणि त्यांनी ह्या जमातीला गुन्हेगारीचा कायदा लागू केला तर त्यांचे व्यापार केंद्र व साधणे यावर ताबा मिळवला,देश व राज्यांतर्गत त्यांच्या मूक्तसंचाराला बाधा निर्माण झाली,त्यांची स्वतःची स्वतंत्र असलेली संस्कृती,भाषा,वेशभूषा,स्वयंपूर्णतांडा वसाहत व पंचपंचायत यांचे अस्तित्व धोक्यात आले हे पाहून पून्हा सतगरू सेवालाल महाराज यांचे पाचव्या पिढीचे वंशज तपेसरी रामराव महाराज हे सतगरू सेवालाल महाराज यांच्यानंतर ब्रम्हचारी राहिले,संत रामराव महाराज यांचा जन्म दि.7 जुलै,1935 रोजी गुरूपौर्णिमेला परसराम राठोड व पुतळाबाई यांच्या कुटुंबात पोरीयागड आताचे पोहरादेवी जि वाशिम,महाराष्ट्र येथे झाला.
“पोरीयातारा निकळो
टांढो पेडो लदगो!”
अर्थात सकाळच्या पहिल्या प्रहरात गोर(बंजारा) जमातीचा तांडा लदेणी व्यापार करायला सुरुवात करत असे मात्र देशाचे बदललेले कायदे यांमुळे त्यांना बाधा निर्माण झाली आणि ही जमात खूळचट अंधश्रद्धा,व्यसनाधीनता आणि दारिद्र्यात खितपत पडली होती,त्यातच देश स्वतंत्र झाला मात्र त्यांना कोणत्याही संविधानिक सवलती मिळाल्या नाहीत,एक भाषा,एकच संस्कृती,एकच वेशभूषा व वेगळेपणा असतानाही ह्या जमातीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या प्रवर्गात टाकण्यात आले,त्यामुळे ही जमात विकासापासून कोसो दूर तर राहिलीच तसेच ते विषण्ण अवस्थेत जगू लागली होती,अशा वेळी रामराम महाराज यांना भारतातील सर्व राज्यातील गोर(बंजारा) जमातीचा शोध घेत सर्वप्रथम त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केला,हळूहळू त्यांच्यामध्ये स्वाभिमान व आपल्या संस्कृती आणि ईतिहासाची जाणीव करून दिली,एकत्र आलेली जमात शेतीकाम,शिक्षणाकडे वळली.
रामराम महाराज यांनी केलेल्या जाणीव जागृकतेमुळे अनेक लोक नौकरी उद्योगात स्थिरावली,महाराजांनी वसंतराव नाईक,सुधाकर नाईक, एल आर नाईक सारख्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी सारख्या प्रधानमंत्रापर्यंत जमातीच्या आरक्षण व सवलतीची मागणी रेटून धरली त्याचा फायदा आंध्रप्रदेश,कर्नाटक व तेलंगणासारख्या राज्यांना झाली,तेथे ह्या जमातीला अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण देऊन सवलती दिल्या गेल्या मात्र शेजारी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ही जमात वंचित राहिली.
संत रामराव महाराज यांचे कार्य तळागाळापर्यंत पोचले होते त्यांनी गोरगरिबांमध्ये समानता आणली त्याच्या कार्याची पावती म्हणून कर्नाटक सरकारने त्यांना मानद डाॅक्टरेट प्रदान केली,त्यांच्या समाजसेवेबद्दल देशाचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी,लाल बहादूर शास्त्री,देवेगौडा,नरसिंहराव,मनमोहनसिंग,अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी सारख्या तसेच राष्ट्रपती झेलसिंग,के आर नारायणनन,प्रतिभा पाटील,प्रणव मुखर्जी यांनी देखील कौतुक केले आहे,संपूर्ण आयुष्य आपल्या संस्कृती आणि ईतिहास जिवंत करण्यासाठी आणि लोकांमध्ये जाऊन त्यांची जाणीव जागृती केली विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरिबांना त्यांच्या संविधानीक सवलती मिळाव्या यासाठी त्यांनी 3 डिसेंबर,2018 रोजी पोहरादेवी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली ही मागणी ते शेवटपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपर्यंत करीत होते ती मागणी आणि जमातीची समस्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पोहरादेवीत जाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनीे केली होती मात्र काल त्यांच्या 88 व्या वर्षी हतबल हाताने निघून गेल्याने ती शेवटची ईच्छा ही पूर्ण होऊ शकली नाही,अनेक वर्षापासून त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मला मिळाली,जवळून त्यांचे लौकिक कार्यही पाहता आले, सवलती तळागाळापर्यंत पोहोचाव्यात अशी तळमळ असणारी ही महान व्यक्ती शेवटी पार्थिव पोहरादेवीत पोहचेल परंतू ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ती सवलत पोहचली नाही याची सल सतत त्या मृतात्याला सतावत राहील शेवटी गोरमाटी भाषेतज सांगायचे झाल्यास ‘मूयेनं मटी आन जितेनं बाटी!’ भावपूर्ण श्रद्धांजली!!!
Nilesh Prabhu Rathod
निलेश प्रभु राठोड
9892333233
osd2minister@gmail.com
Tag : Banjara Dharmguru Sant Ramrao Maharaj, Sant Sevalal Maharaj