श्रध्येय सुधाकरराव नाईक साहेबांनी राबवलेल्या ”जलक्रांती” वर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न…..

( ”जलक्रांतीचे जनक” म्हणून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना ‘प्रोजेक्ट’ करण्याचा शासन निर्णय… आपण अजून अंधारातच)

“पाणी अडवा, पाणी जिरवा मूलमंत्र देऊन सर्वप्रथम महाराष्ट्रात जलसंधारण खाते निर्माण करणारे, ‘जलसंधारणाचे प्रणेते’, जलक्रांतीचे बीज रोवून जलसमृद्ध महाराष्ट्राचे उद्गाते बनलेले ‘जलक्रांतीचे प्रणेते’, पाणलोट क्षेत्र विकास योजनेचे जनक, महाराष्ट्रात विनाअनुदानित तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय घेऊन तंत्रशिक्षणक्रांती घडवून आणणारे ‘उच्च व तंत्रशिक्षणाचे उद्गाते’, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणारे शिक्षणमंत्री, स्वतंत्र महिला व बालकल्याण विभागाची निर्मिती करणारे मुख्यमंत्री, देशात सर्वप्रथम जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणारे मुख्यमंत्री आणि महत्वाचे म्हणजे मुंबईतील माफियाराज संपवून भूखंड माफियांना सळो की पळो करून सोडुन त्यांना गजाआड करणारे ‘गुंडासाठी कर्दनकाळ’ ठरलेले माजी मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, ज्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना देशभर ”जलक्रांतीचे प्रणेते” म्हणून संबोधले जाते, अश्या श्रद्धेय सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त या जिगरबाज नेत्याच्या कार्यकर्तृत्वाला शतशः नमन

मात्र प्रिय बंधू-भगिनींनो,
कदाचित आपल्याला माहिती नसावी ज्या सुधाकररावजी नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांना ‘जलक्रांतीचे प्रणेते’ म्हणून सर्वजण नमन करत आहोत, त्याच वेळी दुसरेकडे १२/६/२०२० रोजी जलसंपदा विभागाने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना ”जलक्रांतीचे जनक” असे संबोधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जयंतीदिनी १४ जुलै रोजी ”जलभूषण पुरस्कार” प्रदान करण्याबाबत शासन निर्णय काढण्याचा प्रताप केला आहे. तो आपल्या माहितीसाठी पाठवत आहे.

बंधुभगिनींनो, हे असे वारंवार होत आहे कारण आपण अजून झोपलेलेच आहोत…..कृपया या अश्या गोष्टीं गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा…..!!!????????????

( टीप:- सोबत जलसंपदा विभागाचा १२ जून, २०२० चा संबंधित शासन निर्णय आपल्या माहितीसाठी)

????????जाग बंजारा जाग वेळ यी क्रांतीरी आयी ????????

????????????। सुधाकरराव नाईक की जय।????????????

Tag : Sudhakarrao Naik, Sudhakar rav naik, CM Sudhakar rao Nai