वसंतराव नाईक साहेबाला भारतरत्न मिळावे व गोरबोली बंजारा भाषा भाषेला राजभाषा म्हणून घोषित करावे यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद मानोरा येथे संपन्न.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे व बंजारा गोर बोली भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद वाशिम जिल्हा यांच्याकडून चिंतन मंथन बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे हे दिनांक 31/8/2020 आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये खालील विषयावर चर्चा झाली.
१) वसंतराव नाईक साहेबांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे.
२) गोरबोली बंजारा भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळावी.
३) भारताची राजधानी दिल्ली व महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे बंजारा भवन ची उभारणी करावी.
अशा विविध विषयावर चर्चा झाली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्रा.विलास राठोड (राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद), प्रा.जय चव्हाण,संतोष नाईक महाराज, वसंतराव राठोड ( राज्य संघटक महाराष्ट्र), सुहास पवार (प्रसिध्दी प्रमूख महाराष्ट्र),श्याम राठोड सर (जिल्हाध्यक्ष वाशिम जिल्हा) यांची उपस्थिती होती. व नवीन पदाची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये
सुनील राठोड (विभागीय संघटक), आर.पी.राठोड (जिल्हा उपाध्यक्ष),श्याम राठोड (जिल्हा उपाध्यक्ष), वीरेंद्र पवार (जिल्हा संघटक),नितीन राठोड (जिल्हा युवा सचिव),महेश राठोड (जिल्हा युवा संघटक),प्रवीण जाधव (युवा तालुका अध्यक्ष), आशिष राठोड (तालुका उपाध्यक्ष),पंकज चव्हाण (तालुका सचिव),सुनील जाधव (संघटक),आकाश चव्हाण (प्रशिधी प्रमुख), मुकुंद जाधव (कोषाध्यक्ष) व रोशन चव्हाण ( मानोरा तालुका अध्यक्ष ) पदी नियुक्ती करण्यात आली.
Tag : Vasantrao Naik Bharatratna, Gorboli, Banjara bhasha, Rashtriy Banjara parishad