Vinod chavan

मुंबई (प्रतिनिधी) – एका कार्यकर्त्याने
‘हरीतक्रांतीचे प्रणेते’ म्हणून म्हणून फलकावर
उल्लेख केल्यामुळे वाद झाल्याने एकनाथराव खडसे
यांनी या प्रकरणी कार्यकर्त्याच्या वतीने
दिलगिरी व्यक्त केली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे
यांचा दि. २ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता.
यानिमित्त एका फलकावर त्यांना ‘हरीतक्रांतीचे
प्रणेते’ म्हणून गौरविण्यात आले होते. यामुळे वाद
निर्माण झाले. सोशल मीडियात यावरून
खडाजंगी झाली. या प्रकरणी एकनाथराव खडसे
यांनी एका निवेदनाद्वारे त्या कार्यकर्त्यातर्फे
दिलीगिरी व्यक्त केली आहे. या निवेदनात नमूद केले
आहे की,
‘माझ्या वाढदिवसानिमित्तच्या शुभेच्छा जाहिरातीत
पक्षाच्या एका कार्यकर्त्याने माझा उल्लेख
हरितक्रांतीचे प्रणेते असा केला.
याचा काही लोकांनी अपप्रचार सुरु केला आहे.
संबंधित जाहिरातीतील मजकूर हा त्या कार्यकर्त्याने
दिलेला आहे.
कुणाच्या भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता.
परंतु तरीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे
कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर
या कार्यकर्त्याच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त
करतो.’
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘वास्तविक पाहता,
सिंचनाच्या संदर्भात स्वर्गीय वसंतराव नाईक हे
आमचे आदर्श आहेत. त्यांचा आम्ही सन्मानच
करतो. स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेनेच
राज्यात युती सरकारच्या कार्यकाळात
हरितक्रांती यावी म्हणून आम्ही प्रयत्न केले.
सिंचनासाठी गोदावरी मराठवाडा, तापी, कृष्णा,विदर्भ
व कोकण अशा पाच पाटबंधारे विकास
महामंडळाची स्थापना करुन सुमारे २५ हजार
कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली. संबंधित
कार्यकर्त्याच्या वतीने मी पुन्हा दिलगिरी व्यक्त
करतो. या कार्यकर्त्यानेही यापूर्वीच
दिलगिरी व्यक्त केलेली आहे.’