गोर बंजारा समाजाच्या संस्कृतीची गोवा येथे अवमान व अपमान करुन विठंबना केल्या प्रकरणी त्या सर्व माथेफिरु व समाजकंठकाचे जाहिर निषेध… जाहिर निषेध…..जाहिर निषेध -अँड. रमेश खेमू राठोड

तमाम माझ्या देशातील गोर बंजारा बंधू आणि भगिनिंनो,आपण जागे तरी कधी होणार आहोत…? वेळोवेळी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे,तर कधी समाजालाअवमान अपमानित केले जात आहे.माझ्या पवित्र राज्यघटनेनी दिलेला मुलभुत हक्क-अधिकार तर सोडाच पण कधी कधी शासन,कधी कधी प्रशासन तर कधी कधी असे काही माथेफिरु समाजकंठक आपल्याला जगण्यापासूनच परावर्तित करीत आहे.बंधुनो वेळीच जर आपण योग्य ती पाऊले उचलली नाही तर एक दिवस श्वास घेणे सुद्धा अवघड होवून जाईल..मग आता तरी विचार करा बंधुनो,माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर ह्या समाजाची काही तरी देण आहे ह्याची भान ठेवा.स्व:ताला नेता म्हणून टेंबा मिरविण्यापेक्षा समाजावर होणारा अन्याय अत्याचाराचा पण विचार जरूर करावे ..खरच आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची जाणीव का होत नाही..? का आपल रक्तच थंड पडलेला आहे.एक जबाबदार नेता व माणूस म्हणून आपल्याला काहीच वाटत नाही ह्याची मला खंत वाटते.नाही तर आता तुम्हीच सांगा बंधुनो अशा माथेफिरु समाजकंठकाच निषेध कोणत्या स्वरुपात करायच….!
गोर बंजारा समाजाची ओळख व ठेवा असणाऱ्या बंजारा वेशभूषा याची चेष्ठा व मस्करी एकदम खालच्या स्तरावर जावून केली आहे तसेच समस्त गोर बंजारा समाजाच्या भावना दुःखविण्याचे व जाती धर्मात वाद तसेच तेड निर्माण करण्याचे काम त्या सर्व माथेफिरुनी केले आहे.माझ्या बंधुनो सदरची घटना हे खुपच गंभीर व लाजिरवाणी आहे तसेच मानवतेला व लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे.बंधुनो गोवा परिसरातील 15 ते 20 माथेफिरुनी गोर बंजारा समाजाला चोर,भिकारी व परके लोक आहेत असे सोशल मीडिया मध्ये पोस्ट टाकून समाजातील लोकांना बदनाम केलेले आहे..!
बंधुनो गोर बंजारा समाजाची बदनामी होईल असे चित्रे,वक्तव्ये केलेले पोस्ट त्या सर्व माथेफिरुनी सोशल मीडिया मध्ये टाकुन आपल्या संस्कृतीची विठंबना केलेली आहे.सदर घटनेबाबत गोवा राज्यात जावून तेथील सर्व गोर बंजारा बांधवाना सोबत घेवून त्या सर्वावर कठोर कारवाई करण्यात यावे यासाठी परवरी पोलिस स्टेशन मध्ये जावून रितसर तक्रार देण्यात आली आहे.तसेच विश्रांतवाडी पोलिस स्टेशन-पुणे येथे एन.सी.नंबर 262/18 भारतीय दंड संहिता कलम 499,500,501 व 34 अन्वये मी स्वतः गुन्हा दाखल केला आहे….! बंधुनो समाजावर होणारा अन्याय पाहुन जिव कसाविस होवून तीळ तीळ तुटत आहे ..माझ्या बंधुनो कायद्याच्या चौकटित राहुन ह्या बंजाराची ताकत दाखवा त्या नालायक लोकांना त्यांची जागा दाखवा अन्यथा असे घाणेरडे माथेफिरु लोकांची दादागिरी वाढेल.कायद्याचे जरब त्यांना बसवु ह्या साठी आपल्या सर्वांनी एक होवून लढा दिला पाहिजे…!
बंधुनो मी माझ्या समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच अन्याय अत्याचार विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास तयार आहे,मला फक्त आपल्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे.बंधुनो पक्ष-संघटना जरूर वाढवा पण स्वता:ला मोठे नेते समजणाऱ्यानो माझ्या पीड़ित समाजाकडे एकदा तरी डोळे उघडून बघा…अन्यथा समाजातील नेत्यानो एक दिवस हाच माझा समाज तुमच्या तोंडाला काळे फासल्या शिवाय राहणार नाही.. माझा उद्देश कोणाला अपमानित अथवा भड़कविण्याचा बिलकुल नसून समाजावर होणारा अन्याय अत्याचार विरोधात लड़ा देवून न्याय मागण्याचा उद्देश् आहे…बंधुनो आपल्या संस्कृतीची विठंबना करणाऱ्या माथेफिरु समाजकंठकावर कठोर कारवाई व्हावी यासाठी लोकशाही मार्गाने त्या सर्व दोषी माथेफिरूंचा सर्व स्तरातून निषेध तर झालाच पाहिजे आणि आप-आपल्या परिसरामध्ये संबधित पोलिस स्टेशन मध्ये जावून तक्रार करावी व त्या सर्व हरामखोराना कायद्याने धड़ा शिकवावे हिच माफक अपेक्षा व्यक्त करतो…!
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् मुंबई, महाराष्ट्र