नागपूर:दि.22 डिसेंबर,2017
तेलंगणा ह्या राज्यात गोर-बंजारा / लंबाडा ही जमात अनुसुचित जमाती प्रवर्गात असून त्यांना ह्या सवलती मिळू नये म्हणून आकसापोटी व षडयंत्र रचून गोंड व कोया/कोलामा ह्या आदिवासी जमातींकडून दि.15 डिसेंबर, 2017 रोजी जैंनुर ऊत्नुर व ईंद्रनेली जिल्हा आदिलाबाद, तेलंगाणा येथे हिंसाचार घडविण्यात आला, त्यामध्ये 5 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. त्याचा फटका महाराष्ट्राच्या
सिमावर्ती भागातील सेवादास नगर, प्रेमनगर व परमडोली तांड्यासह इतर जवळपास 14 तांड्यांना बसला असून तिथल्या रहिवाशांना ह्या आदिवासी जमातींकडून तसेच नक्षलवाद्यांकडुन धमकावणे सुरू असून तांडेच्या तांडे खाली करण्याची हिंसाचार घडविणाऱ्यांकडुन धमकी देण्यात येत आहे. या सर्व घटनांमुळे देशभरात तीव्र संताप / प्रतीक्रिया उमटत असल्याने दिनांक 19 डिसेबर 2017 रोजी राज्यमंत्री संजय राठोड,माजी मंत्री तथा आमदार मनोहर नाईक,माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड,आमदार प्रदिप नाईक,आमदार डाॅ.तुषार राठोड,ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजू नाईक,गोरसेनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण,डाॅ.टी.सी.राठोड, कर्मचारी संघाचे मोहण चव्हाण व राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांची व सामाजिक संघटनांच्या प्रतिनीधी तसेच कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यात हया घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला, त्यानंतर हया बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्व आमदारांनी तातडीने मुख्यमंत्री यांच्याकडे राज्यातील सिमावर्ती भागातील जिवती तालुका येथे तथापि तेलंगणा सरकारला तिथल्या गोरबंजारा / लंबाडा समाजाला तात्काळ संरक्षण प्रदान करून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली होती,राज्यमंत्री संजय राठोड,माजी मंत्री तथा आमदार मनोहर नाईक,माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड,आमदार प्रदिप नाईक,आमदार डाॅ.तुषार राठोड ह्या सर्व आमदारांच्या वतीने ना.संजय राठोड व हरिभाऊंनी मुख्यमंत्र्यांनी तेलंगाणा सरकारला याबाबतीत तातडीने सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आपण कळवू तसेच जिवती जि.चंद्रपूर येथील विस्थापीत बंजारा कुटूंबियांचे पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले,यावेळी ना.संजय राठोड यांनी समाजाच्या वतीने वारंवार संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीची प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधले असता सदर जयंतीस लवकरच मान्यता देऊ असे आश्वासन दिले.मुख्यमंत्र्यानी एकाच भेटीत तिनही मागण्या मान्य केल्याने समाजात समाधान व्यक्त केले जात असून सर्व आमदारांच्या वतीने दोन्ही *”राठोड”* यांनी केलेली शिष्टायी यशस्वी ठरली आहे.