दि.19/2/2018
प्रति,
मा.ना.संजय राठोड
महसूल राज्य मंत्री मुंबई
महाराष्ट्रा राज्य
विषय-गोरबोली भाषेच्या संवर्धन आणि रक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांनी गोरबोली भाषेला आपल्या कवेत घेण्या बाबत..!
महोदय,उपरोक्त प्रकरणी आपणास सविनय विनंती की,गोरबोली भाषेच्या मूळ अस्तित्वाचे अवशेष आज नष्ट होताना दिसत आहे.भविष्यात गोरगणांची मातृभाषा असलेली गोरबोली भाषा आपल्या मूळ स्वरूपासह जगेल काय ? हा प्रश्न भेडसावत आहे.
भारतातील 27 राज्यातील 780 भाषेचे नुकतेच सर्व्हेक्षण केले असता जवळ जवळ 400 भाषा येत्या पाच दशकात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या भाषेच्या यादीत गोरबोली भाषेचा समावेश असू नये यासाठी आज प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे.
1 मे 1966 रोजी महाराष्ट्राची रज भाषा *मराठी* असल्याचे घोषित करताना महा नायक वसंतराव नाईक साहेबांनी ” या राज्यात इतर भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांची यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची शासन काळजी घेईल अशी हमी दिलेली होती”हे आपणास विसरता येणार नाही.
आपल्या देशात 23 विद्यापीठात भाषा विज्ञान आणि भाषा अध्ययन विभाग आहेत.त्या द्वारेही मरणप्राय यातना भोगणार्या भाषांना पुनर्जीवित करण्याच्या योजना राबविल्या जातात.
महोदय,आपणास विनंती की,आपल्या अस्तित्वासाठी धडपडणार्या गोरबोली भाषेच्या संवर्धन आणि रक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातील भाषाविज्ञान आणि भाषा अध्ययन विभागात गोरबोली भाषेचा समावेश व्हावा या साठी आपण मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे विनंती करुन गोरबोली भाषेस न्याय मिळवून द्यावे…ही विनंती..!
आपला
भीमणीपुत्र
मोहन गणुजी नाईक
चिंचखेड ता.किनवट
प्रति,
1,मा.राजूसिंग नाईक
राष्ट्रीय अध्यक्ष
ऑ.इं बंजारा सेवा संघ
2,मा.मनोहरराव नाईक
विधानसभा सदस्य
3, मा. प्रदीप नाईक
विधानसभा सदस्य
4,मा. हरिभाऊ राठोड
विधान परिषद सदस्य
5, मा. तुषार राठोड
विधानसभा सदस्य