माझ्या जीवलग बंधू आणि भगिनींनो,गोर बंजारा सामाजाची महती अथवा ओळख सांगायला शब्द अपुरे पडतात,पण एक सच्चा,प्रामाणिक,विश्वासू,दिलदार दमदार,प्रेमळ,आपुलकि जपणारा,माणुसकीला जागणारा,जगाला जीवनाचा मार्ग शिकविणारा,मान सन्मानाने जगणारा अशा अनेक गुणांनी संपन्न असणारा माझ्या गोर बंजारा समाजाची ओळख आहे …म्हणून मला म्हणावेसे वाटते की *” विजयासाठी झेप आमुची कधीच नव्हती म्हणून अम्हा खंत नाही पराजयाची..,जन्मासाठी कधीच हटून बसलो नव्हतो म्हणून अम्हा खंत नाही मरावयाची….!”* अशा वाखण्यजोगे ओळख असणारा माझा गोर बंजारा समाज आहे…!
गोर बंजारा समाजाचा गर्वाचा मानाचा व एक जागतिक पातळीवर समाजाची ओळख म्हणून 8 एप्रिल हा दिवस *अंतरराष्ट्रीय गोर बंजारा दिवस* म्हणून जगभर आनंदाने साजरा करतात,त्याच अनुषंगाने विश्व गोर बंजारा सेवा संघ व स्व.वसंतराव नाईक लोकसवा सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 08/04/2018,वार-रविवार रोजी,अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी-पुणे येथे अतिश्य आनंदाने व जल्लोषात विश्व गोर बंजारा दिवस साजरा करण्यात आले.अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भुषविताना खुप अभिमान वाटत होता.सदर वेळी बहुसंख्य माझ्या माता भगिनी बंजारा समाजाचे खरी ओळख असणाऱ्या वेशभूषेत आल्या होत्या.अशा वेशभूषेत आलेल्या माझ्या माता भगिनींना पाहुन आनंदाने डोळे भरून आले होती..माझ्या गोर बंजारा समाजाची संस्कृतिचि एक झलक बघुन गर्वाने माझी माझी छाती फुगली होती…!
सदर कार्यक्रमाच्या वेळी माननीय युवराज दादा आडे साहेब,माननीय अमीन रेड्डी साहेब,माननीय दामू पवार साहेब,माननीय सुभाष राठोड साहेब,माननीय शंकर राठोड साहेब,माननीय बंटी चव्हाण साहेब,माननीय धनराज राठोड साहेब,माननीय अण्णा पवार साहेब माननीय शेठी पवारसाहेब,माननीय प्रभु पवार साहेब,माननीय नंदुभाऊ राठोड साहेब,पुजारी चंदू महाराज,पुजारी शिवाजी महाराज,पुजारी देसु महाराज व अनेक इत्यादी मान्यवर तसेच माझे प्राणप्रिय माझे गोर बंजारा बंधू भागिनिं उपस्थित होते…
माझ्या जीवलग बंधू आणि भगिनिंनो या शुभदिनी आपण सर्वानी एक होवून समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात लढा द्यावे व समाजाच्या उन्नति व भल्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे हिच माफक अपेक्षा व्यक्त करतो..! विश्व गोर बंजारा दिवस या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन विश्व गोर बंजारा सेवा संघ व स्व.वसंतराव नाईक लोकसेवा ट्रस्ट यांनी केले होते.तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय युवराज दादा आड़े यांनी केले व सूत्रसंचालन माननीय आदेश राठोड साहेब यांनी केले तर अभारप्रदर्शन माननीय अंकुर राठोड साहेब यांनी केले…..!
गजानन धावजी राठोड
प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्