श्रीक्षेत्र माहूरगड येथे गोरजाणिवेने एकवटला बंजारा समाज.

श्रीक्षेत्र माहूरगड
गोरजाणिवेने माहूरात एकवटला बंजारा समाज.

राष्ट्रसंत रामराव महाराजांचा आशीर्वादपर संवाद.

सेवालाल महाराज मंदिर भूमिपूजन , गोरधर्म फलक व तांडेसामू चालो अभियान शाखा अनावरणनाचा त्रिवेणी संगम.

वृतांत :
राज्यातील विवध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माहुरगड येथील कार्यक्रमाने माहूर शहर “गोरमय” झालेला दिसून आला.
संत सेवालाल महाराजांच्या शिकवणी नुसार समाजाने वाटचाल करावी.शिवाय समाजातील व्यसनाधीनता व हुंडा प्रथा नाहीसे करावे.समाजासाठी कार्य करणाऱ्याना सदैव आशीर्वाद राहिल असे त्यांनी आशीर्वादपर संवाद साधला.
चळवळीतील नेते हरिभाऊ राठोड, बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक यांनी समाज संघटन व आरक्षण बचावसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
समाजाच्या विकास व संस्कृतीबाबत जितेंद्र महाराज , रमेश महाराज, महंत श्याम भारती, सुनील महाराज यांनी समुचित मत मांडले.तर तांडा व्हिजन विषयी व तांडयाच्या संविधानिक हक्कांबाबत तांडेसामू चालो अभियानाचे एकनाथ पवार यांनी मत मांडले.
माहूर मध्ये बापूच्या आशीर्वादाने धन्य झाल्याची भावना प्रास्ताविकातून सुमीत राठोड व्यक्त केली.
बंजारा पारम्पारीक वेशभूषा , डफडाच्या ठोळीवर थिरकत बंजारा संस्कृतीचे विलोभनीय दर्शन पहायला मिळाले.
उपस्थिती:
संत रामराव महाराज, पोहरगड ,
राजू नाईक, अध्यक्ष AIBSS
आमदार हरिभाऊ राठोड ,
पी.बी.आडे,
महंत श्याम भारती,
जितेंद्र महाराज, रमेशजी महाराज, सुनील महाराज पोहरागड, शेषराव चव्हाण नांदेड , एकनाथ पवार , प्रवर्तक तांडेसामू चालो अभियान,
प्रफुल्ल राठोड मांडवी, नंदू पवार, प्रदेश अध्यक्ष बहुजन क्रांती दल, कैलास राठोड सिनेट सदस्य , संध्या राठोड जी प सदस्य ,
दत्ताराम राठोड , सचिन नाईक , संजय राठोड जी प सदस्य , अतुल राठोड उद्योजक , बंडूभाऊ नाईक , नीलेश पवार, दीपक राठोड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संचालन अरविंद जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या सफलतेसाठी गोर सेवा संघ, सेवादास मंदिर ट्रस्ट च्या सर्व कार्यकर्त्याने परिश्रम घेतले.

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् न्यूज