मुंबई येथे गोर बंजारा समाजातील काही निवडक लोकांसोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची बैठक संपन्न

श्री. सतिष एस राठोड ✍

मुंबई :- दि.२२ मे २०१९ रोजी आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने गोर बंजारा समाजातील महाराष्ट्रातील काही निवडक प्रतिनिधी सोबत बाळासाहेब आंबेडकर यांनी बैठक घेतली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक तथा भटक्या विमुक्तांचे ज्येष्ठ नेते मा.आमदार लक्ष्मण माने व राज्य प्रवक्ते प्रा किसन चव्हाण यांची उपस्थिती होती. तसेच गोर बंजारा समाजातील सर्वच वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रतिनिधींनी आप आपले मत मांडले आणि आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन यावेळी बाळासाहेबांना दिले.

  • त्यासोबत महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मदारसंघापैकी ११५ जागेवर निर्णायक भूमिकेत असणाऱ्या गोर बंजारा समाजाला ३०-३५ जागेवर प्रतिनिधित्व देण्यात यावे. ही मागणी सर्व गोर बंजारा समाजाच्या वतीने राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते समन्वयक रविकांत राठोड यांनी मांडली त्यावेळी सकारात्मक बोलताना बाळासाहेबांनी गोर बंजारा समाजाच्या मतदार संघाची यादी व कार्यकर्त्याची यादी द्या नक्कीच यावर सकारात्मक विचार करून गोर बंजारा समाजाला न्याय देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

तसेच सोबत महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाच्या काही प्रमुख मागण्या पक्षाच्या जाहीरनाम्यात घेऊन गोर बंजारा समाजाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी सर्वांनी सोबत येण्याची विनंती ही यावेळी त्यांनी केली.

  • या बैठकी मध्ये जवळ जवळ बऱ्याच महत्वाच्या विषयावर ३-४ तास चर्चा करण्यात आली. त्याप्रसंगी महाराष्ट्रातील खान्देश मराठवाडा व विदर्भातील विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या लोक प्रतिनिधींची उपस्थिती होती. बैठकीस उपस्थित राहिल्या बद्दल बाळासाहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.