वसंत विचारधारा : सर्वसमावेशकतीचे नवी पहाट

राज्यात किंवा राज्याबाहेर आज विविध विचारधारा समाजात आमुलाग्र बदल घडवून आणत आहे. प्रत्येक विचारधारा आपापल्या मुलत्वानुसार प्रगल्भ आहेत. परंतु राज्याच्या स्थापनेपासून तर आजच्या दिनांकापर्यंत किती विचारधारा राज्यात कसे आणि कुणासाठी बदल घडवुन आणत आहेत. ते कितपत प्रभावी झाल्या किंवा नाही याचे मंथन करणे काळाची गरज आहे. राज्यात किंवा राज्याबाहेर विविध विचारधारा जनमाणसात रूजलेल्या असताना देखिल ‘वसंत विचारधारा’ (NAIK THOUGHT) उदयास का आले ? किंवा जनमाणसात ‘वसंत विचारधारा’ उदयास आणण्याची गरज का निर्माण झाली, याचेही मंथन-चिंतन करणे काळाची गरज आहे. 1961 ते 1975 हा कालखंड महाराष्ट्राचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यामध्ये बहुतांशी महानायक वसंतराव नाईकाच्या कतृत्वाचा योगदान आहे. 1975 ते 1995 या कालखंडात नाईकसाहेबाचे ‘व्हीजन’ काहीप्रमाणात पुढे रेटण्यात आले. त्यामुळे अस्थिर शासन कालखंडातही राज्य मजबूत होता. परंतु 1995 पासून आजपर्यंत राज्य पिछाडीवर येत गेला. राज्यात 1961 पुर्वी प्रमाणेच आज अनेक प्रवाह सत्ता केंद्रीत, जाती धर्मकेंद्रीत होत आहे. त्यामुळेच राज्य किंवा राज्याबाहेरची परिस्थिती अस्थिर होत आहे. देश भांडवलदाराकडे, खाजगीकरणाकडे आकर्षित झाला आहे. आज दिशाहीन अवस्था होत आहे. कारण प्रस्थापित विचारधारा विशिष्ट वर्गापुरते मर्यादीत झालेली आहे. त्यामुळे राज्याला पर्यायी राष्ट्राला एक प्रभावी दूरदृष्टी असणारी आणि सर्वसमावेशक असणार्या विचारधारेची नितांत गरज भासन असताना ‘वसंत विचारधारा’ अर्थात ‘NAIK THOUGHT’ चा उदय झाला. वसंत विचारधारेचे मुलतत्वे खर्या अर्थाने सर्वसमावेशक, विकेंद्रीत, दूरदृष्टीकोनी आणि गतीप्रधान आहे. त्यामुळे राज्याच्या पटलावर आज उदयास आलेली सर्वसमावेशकतेची नवी पहाट खर्या अर्थाने वसंत विचारधारा होय. सर्वसमावेशक विचारधाराच जनमाणसाला, रयतेला नवी दिशा देऊ शकते. सर्वाच्या उत्थानासाठी बहुपयोगी ठरू शकते. महानायग वसंतराव नाईकांची दुरदृष्टी आणि विचारकृती (NAIK THOUGHT) सर्वसमावेशक असल्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीत राज्य ‘सुजलाम-सुफलाम’ होता आणि त्यांच्या विचारकृती काही प्रमाणात अंगिकारल्यामुळे राज्य आज काही प्रमाणात विकसनशील आहे. हे तितकेच वासतव. प्रगतीशील राज्य हवा तर वसंत विचारधारेचा पाईक पूर्णतः व्हावे लागेल. जीवनात गती हवी, तर वसंत विचारधारेचा अनुयायी व्हावे लागेल, कारण हे गतीप्रधान सामर्थ्य वसंत विचारधारेध्ये आहे. महानायग वसंतराव नाईकांनी शेतकरी, कामगार, गरीब, दूर्बल, वंचित अशा सर्व घटकाना गतीमान करून त्यांना आत्मसन्मान बहाल केले. त्यांच्यासाठी प्रत्यक्षात विविध लोकोत्तर योजना राबविल्या. सर्वाच्या हिताचे संवर्धन केले. वसंतराव नाईकांनी एखादे ग्रंथ लिहिण्यापेक्षा कृतीवरच अधिक भर देत राहीले. त्यांच्या अभिनव दूरदृष्टी असणार्या सर्वसमावेश विचारकृतीमधून आज राज्य खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशात महानायक वसंतराव नाईकाच्या दूरदृष्टीची आणि विचारकृतीचे अनुकरण होत आहे.

त्यांनी आखलेल्या रयतहिताच्या अभिनव योजना म्हणजे ज्यांच्या अभिजात प्रगल्भ विचारकृतीचे प्रतिबिंबे (NAIK THOUGHT) आहेत. आज संपूर्ण देशात नाईक साहेबाच्या विविध लोकोत्तर योजनाची सर्वत्र प्रशंसा होते. “वसंतराव नाईकाची दूरदृष्टी ही राष्ट्रविकासात भर घालणारी होती. अन्नधान्याच्या बाबतीत आज भारत देश अग्रेसर आहे. त्यामध्ये नाईक साहेबाचे खूप मोठे योगदान आहे.” अशा शब्दात राष्ट्रपती मा.प्रणव मुखर्जी यांनी ‘कृषी वसंत’ या राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान नाईकसाहेबाची पर्यायाने त्यांच्या विचारकृतीची प्रशंसा केली. दबलेल्या, पिचलेल्य रयतेच्या जीवनात आनंदाचे, समृध्दीचे सुवर्णकिरण पोहोचवण्यासाठी नाईकसाहेब आयुष्यभर झिजले. सर्व घटकाना सोबत घेऊन न्याय दिला. पारदर्शक आणि गतिमान सुशासन दिले. याकृतीमध्ये नाईक् साहेबाचे बहुआयामी अभिजात विचार दडलेले आहे. एखाद्या महान ग्रंथाप्रमाणेच त्यांचे कृर्तृत्व जीवनाला गतिमान करणारे आहे. नव्या पिढीला अभिजात प्रेरणा देणारे आहे. कारण वसंत विचारधारेचा केंद्रबिंदू ‘माणूस’ आहे. जात-धर्म, प्रदेश, भाषावग ऊ हे वसंत विचारधारेला कुठेही स्पर्शत नाही. हेच या विचारधारेचा एक यश मानावे लागेल. ‘सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय’ हे लोक कल्याणकारी सुत्र नाईकसाहेबाच्या विचार कृती योजनेत आहे. आज वसंत विचारधारा (NAIK THOUGHT) जनसामान्याच्या तनामनात झेपावत आहे.Eknath Pawar या विचारधारेला राजाश्रय मिळाल्याशिवाय ते सर्वदूर पोहचणार नाही, परंतु वसंत विचारधारेला राजाश्रया ऐवजी येथील जनतेचा, रयतेचा हृदयाश्रय अधिक महत्वाचा वाटतो. आज सर्व घटकाना नवी ऊर्जा बहाल करण्याचे सामर्थ्य छअखघ ढकजणऋकढ मध्ये आहे. वसंत विचारधारेचा नवा राष्ट्रवाद, स्वावलंबीकरण आणि विकेंद्रीकरण हा सर्वसमावेशकतेचा परिचय करून देणारा आहे. राष्ट्रविकासात भर घालणारी वसंत विचारधारा सकल जनविकासासाठी गतीमान करणारी आहे. यथार्थपणे जनकल्याण साधण्यासाठी वसंत विचारधारेच्या रूपाने आज सर्वसमावेशकतेची नवी पहाट मिळाली आहे. हे स्वागतार्ह आहे. त्याची प्रतिबींबे नक्कीच काळोख मिटवून ऊजेडाचे दान दिल्याशिवाय राहणार नाही. –

एकनाथ पवार
नागपुर, मो. 9850131368