नाव – श्री.गोविंद मक्काजी राठोड
जन्म् दिनांक – 07 जुन 1942
शैक्षणिक पात्रता – पी.यु.सी.(कला)
पत्ताण – मु.कमळेवाडी पो.शिरुर (दबडे) ता.मुखेड जि.नांदेड
मुळगाव – वर्ताळा तांडा ता.मुखेड जि.नांदेड
निवड – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014,
मुखेड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी
मिळालेली मते – 1,18,781.
कौटुंबिक तपशिल – 1. आई – गंगाबाई मक्काजी राठोड
2. वडील – मक्काजी राठोड
3. भाऊ – 1.किशनराव मक्काजी राठोड(माजी विधानपरिषद सदस्य)
2. पोमा मक्का्जी राठोड
4. मुले – 1. डॉ.हरिष गोविंदराव राठोड
2. डॉ. विकास गोविंदराव राठोड
3. गंगाधर गोविंदाराव राठोड
4. डॉ.तुषार गोविंदराव राठोड
भुषविलेली पदे –
सचिव – विमुक्ता जाती सेवा समिती वसंतनगर (कोटग्याळ),
ता.मुखेड जि.नांदेड (सन 1961 पासून आजतागायत)
नगरसेवक – नगरपरिषद मुखेड (सन 1985 ते 2000 पर्यंत)
नगराध्यक्ष – (दोन वेळा ) नगरपरिषद मुखेड
प्रथम वेळी (दि.20.06.1995 ते दि.19.06.1996)
व्दितीय वेळी (दि.19.06.1997 ते दि.19.07.2000)
संचालक – नांदेड जिल्हा9 मध्या.सह.बॅंक मर्या.नांदेड
(दि.25.06.1997 ते 16.11.2002)
अध्यक्ष – नांदेड जिल्हा मध्य. सह.बॅंक मर्या.नांदेड
(दि.09.12.2002 ते 26.04.2004)
सदस्यि – जिल्हा परिषद नांदेड (सन 2002 ते सन 2012 पर्यंत)
सभापती – अर्थ व बांधकाम सभापती, जिल्हा परिषद नांदेड
(सन 2004 ते सन 2007 पर्यंत)
संचालक – जय शिवशंकर सह.साखर कारखाना मर्या.मांजरी, ता.मुखेड
जि.नांदेड (सन 2001 पासून आजतागायत)
मिळालेले पुरस्कार –
दलित मित्र – महाराष्ट्रप शासनाचा दलितमित्र पुरस्कांर
(सन 1993-94 ला प्राप्त )
राजीव गांधी शिरोमिण अवार्ड – नॅशनल इंटीग्रेशन अॅंड एकॉनॉमिक कॉन्सिल, नवी दिल्ली चा दि.19.08.2006 ला प्राप्त.
राष्ट्रीय सन्मान अवार्ड – नॅशनल एज्युसकेशनल अॅंड ह्युमन रिसोर्स डेव्हदलपमेंट, नवी दिल्ली कडुन दि.30.08.2006 ला प्राप्त
विविध क्षेत्रातील कार्य –
शैक्षणिक कार्य – विमुक्त जाती सेवा समिती,वसंतनगर या शैक्षणिक संस्थे्ची 1961ला
स्थापना करुन विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यवमातून दुर्गम व
मागास भागातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांतना विविध वसतीगृहे,
आश्रमशाळा, प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालये, वरिष्ठ
महाविद्यालय,कन्याशाळा,बालसदन या व यासारख्या अनेक शाखांतून
हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सुरु आहे. विविध उपक्रमांच्या
माध्यममातून शैक्षणिक जाणीव जागृती घडविली जात आहे. महाराष्ट्र
शासनाच्या् समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने भटक्या
विमुक्तांसाठी महाराष्ट्रातीलच नाही तर देश पातळीवरील एकमेव
विद्यानिकेतन पब्लिक स्कूल चालविले जात आहे. ज्याकत
महाराष्ट्रानतील विविध जिल्ह्यालतून हुशार व गुणी 640 मुले व मुली
निवासी व्यवस्थेसह शिक्षणघेत आहेत. मुलींच्या4 शिक्षणासाठी स्वातंत्र
कन्या शाळा उभारुन त्यां च्याआ शिक्षणाला गती दिली जात आहे.
महाराष्ट्रा शासनाच्या सहकार्याने मुलींसाठी स्वतंत्र प्रियदर्शनी मुलींचे
वसतीगृह चालविले जात आहे.
सामाजिक कार्य – शिक्षणा बरोबरच सामाजिक बांधिलकी डोळयासमोर ठेवून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. त्यात समाज
प्रबोधनासाठी विविध विचारवंतांची कै. वसंतराव नाईक व्याख्यानमाला
चालवुन व्याख्यााने आयोजित केली जातात. त्याचबरोबर पालक
मेळावे, विविध विषयावर चर्चासत्रे, परिसंवाद, विविध शिबिरांचे
आयोजन केले जाते. शिबिरात रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर,
रोगनिदान शिबिर, महिला जाणिव जागृति शिबिर, सरपंच व
सदस्यांनसाठी शिबिर,युवक शिबिर, शेतकरी मेळावे, महिला मेळावे,
बचतगट, एड्स जनजागृती शिबीर,सामुहिक विवाह सोहळे, एक गांव
एक गणपती, वाचनालय चळवळीला प्रोत्साहह,व्यंसनमुक्ति अभियान व
यासारखे अनेक सामाजिक कार्य सतत केले जात आहे.
सहकार क्षेत्रातील कार्य – नांदेड जिल्हा् सहकारी बॅंकेवर संचालक व अध्यक्ष असताना ही सहकार चळवळ सर्व सामान्यांच्याज उन्नतीसाठी राबविली. जय शिवशंकर सहकारी साखर कारखान्यांचे संचालक म्हणून कार्य करताना शेतक-यांचे हिताला अधिक प्राधान्य दिले. जिल्हा परिषदेत विविध पदावर असतांना त्यातील अनेक योजना गरीबांपर्यंत पोहचविल्या. शिक्षक सहकारी पतसंस्थे्च्या उभारणीतुन अनेक कर्मचा-यांना वेळोवेळी कर्ज पुरवठयांतुन सहकार्य केले. मुखेड गृहनिर्माण संस्था व समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी म्ह्णून भटक्या् विमुक्तं जातीसाठी अव्याहतपणे कार्य केले.
भटक्या् विमुक्तांसाठी – भटक्या् विमुक्तांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मराठवाडयात सर्वप्रथम विशेष कार्य आश्रमशाळा,वसंतनगर येथे स्थापण केली. त्याचबरोबर अनेक आश्रमशाळा सुरु करुन हजारो विद्यार्थ्यांना शिक्षित केले. भटक्याविमुक्तां साठी स्वतंत्र व सुविधा युक्त पब्लिक स्कुल नव्हते हे लक्षात
घेऊन त्यांच्यासाठी स्वंतंत्र विद्यानिकेतन पब्लिक स्कुल सुरु केले.