शेतकरी जगला पाहिज – भास्कर राठोड ( भासू )

*शेतकरी जगला पाहिजे*
_____________________

भास्कर राठोड (भासू)
ठाणे /मुंबई.

शेतकरी

शेतकर्‍यांची शेती करण्यारांची संख्या कमी होत चाललेली आहे. परंपरागत शेती करणारा वर्ग हा शहराकडे आपली कुच करत आहे कारण शेतकरी हा येवढा हतबल झालेला आहे की एकीकडे शासन हमीभावाला घेऊन राजकारण केलं जात असतो आणि कर्ज माफीला घेऊन शासन फक्त आश्वासने देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसत असतात, १९५० व १९५१ या काळात देशाची GDP ५१% होती आणि आज घडीला २४% आहे. दरवर्षी देशात ३ लाख शेतकरी आत्महत्या करीत आहे. आज ही देशातील ७०% शेतकरी हा शेती व्यवसाय सोडण्याचा मार्गावर आहे पण दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने तो निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाला ५० हजार शेतकरी व शेतमजूर हा शहराकडे कामधंदा शोधण्यासाठी निघत आहे. आणि दुसरीकडे दरवर्षी ४ कोटी शेतकरी आपला पारंपरिक व्यवसाय शेती हा सोडून शेतमजूर होत आहे.
अशा या परिस्थितीत शेतकरी जगला पाहिजे म्हणून शासन स्तरावर मोठं पाऊल उचलले पाहिजे व देशाच्या पोशिंदयाला वाचवण्याचा काम शासनाने केले पाहिजे तरच कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाईल अन्यथा जातीप्रधान देश म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकर्‍यांची थट्टा केली जात आहे आणि या देशात सामाजिक स्तरावर देखील खुप मोठमोठ्या संघटना आहे परंतु शेतकर्‍यांची प्रश्न का मार्गी लागत नाही हा एक अभ्यासाचा विषय बनून ठरला आहे, आपण फक्त गर्वाने म्हणू शकतो देशाचा पोशिंदा शेतकरी आहे पण आम्ही कधिच गर्वाने म्हणत नाही ह्याच पोशिंदयाचा मुलांना देखील चांगलं शिक्षण मिळावं, चांगले आरोग्य मिळावे, जागतिकीकरण, खाजगीकरणा च्या धोरणामुळे देशातील छोट्या उद्योग धंद्यावर खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आणि शेतकरी तर जगण्याच्या स्तिथित नाही आहे कारण आत्महत्यांच्या सरकारी आकडे जर आम्ही बघीतले तर पुढच्या गोष्टीचा आम्हाला अंदाज येईल.
शहरातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या पैकी ८०% वर्ग हा शेतकरीचा मुलगा आहे. मग आमच्याच बापावरती जर ही राजकारणाची व आश्वासनाची टांगती तलवार नेहमी असेल तर आम्ही नेमकं बघ्याची भूमिका घ्यायची का..? हा प्रश्न शहरातील प्रत्येक शेतकर्‍यांच्या मुलांनी विचार केला पाहिजे.
या देशात जर एक मतदान करण्याचा हक्क जर प्रत्येक नागरिकाला असेल आणि श्रीमंत असो किंवा गरिब मतदान करण्याचा हक्क जर समान असेल तर बाकीच्या गोष्टी समान का नाही. यांचं संरक्षण कोण करणार. हे दायित्व कोणाचं आहे. सत्तेसाठी राजकारण होतोय हे जरी आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत असलो तरी राजकारण करून सत्ता मिळवण्याची चढावोढ करणारे हीच मंडळी पाठिंबा पाठिंबा म्हणून आपली बाजू स्वच्छ आणि निर्मळ आहे असे म्हणतात व कालांतराने हीच मंडळी जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा मात्र तेच रडगाणे गातात मग अशा वेळी आम्ही एक सुजाण नागरिक म्हणून काय केले पाहिजे याचा जर आम्ही विचार केला नाही तर येणाऱ्या काही काळात शेतकरीवर्ग हा संपुर्णपणे आपला शेती हा व्यवसाय सोडून देईल आणि आपली भुक भागविण्यासाठी शहराकडे कुच करेल मग जर देशात शेतकरीच जगला नाही तर आज रोजी आम्ही डिझेल पेट्रोल व काही प्रमाणात खनिज तेल विदेशातून विकत घेत असतो आणि त्याच बरोबर जर आम्ही गृहउपयोगी व अन्नधान्य जर विदेशातून आयात करू त्यावेळी किती महागाई असेल याचं आम्ही विचार देखील करू शकत नाही.
म्हणून मला शेवटी असं सांगावेसे वाटते की देशात खुप जटिल समस्या आहे व ह्या समस्या आम्ही सहजपणे सोडवू शकतो तेही जनसामान्यांच्या मदतीने देखील परंतु एक शासन म्हणून सरकारने देखील पुढाकार घेऊन ह्या देशाच्या पोशिंदा शेतकरी वर्गाला वाचवले पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात काय होईल याची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही.
_____________________

*शेतकर्‍यांची थट्टा करण्यापेक्षा, शेतकर्‍याला सन्मान द्या.*

धन्यवाद.

*भास्कर राठोड (भासू)*
*ठाणे /मुंबई*
*८१०८०२४३३२*

गजानन धावजी राठोड

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव् मुंबई, महाराष्ट्र