बोलींमध्ये उमलली सावित्रीबाईंची काव्यफुले
अनुवादाची आनंदशाळा : कमळेवाडी आश्रमशाळेतील मुलांचा प्रयोग जाणते समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची सहचारिणी बनत क्रांतीची मुळाक्षरे गिरवणार्या सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली ‘काव्यफुले’ विविध बोलींमधून अनुवादित झाली आहेत. कमळेवाडी तांड्यावरच्या आश्रमशाळेतील शाळकरी मुलांनी ‘अनुवादाची आनंदशाळा’ या प्रयोगातून हा साहित्यखजिना समोर आणला आहे. लेखणीचा वापर समाजप्रबोधनासाठी करत सावित्रीबाई फुले यांनी सहजसोप्या भाषेत कविता रचल्या. या कवितांचे…