Kailash D.Rathod

“म न से”अन् “बंजारा समाज”
राज ठाकरे यांनी शिवसेनेला राम राम ठोकत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन
वेगळी चुल मांडली.नवविर्माणाचे स्वप्न
महाराष्ट्रातील जनतेला दाखवत थोड्याफार
प्रमाणात यशस्वी सुध्दा झाले. महाराष्ट्र
धर्मा ची संकल्पना मांडून तरूण वर्गाला आकर्षित
करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये असंख्य
तांड्यातील बंजारा तरूण सुध्दा आकर्षित होऊन
बऱ्याच तांड्यामध्ये मनसेच्या शाखा स्थापन
झालेल्या आहेत.ह्या तरूणांना सेवालाल
महाराजांचे बोल आठवन करून देण्याची वेळ
आली आहे.
१) जाणजो…
२) छाणजो…
३) माणजो…
किती महत्वाचे अर्थ आहे या वाक्यात. पण
याचाच विसर पडलेला दिसतो. भावनेच्या भरात
येऊन कुठल्याही बाबीचा सखोल विचार न
करता त्यात सामिल होणे चुकीचे आहे.
राज ठाकरेंचे बहुतांशी भाषण मि ऐकलेले आहे.
त्या मध्ये महाराष्ट्र
मराठी,शिवाजी महाराज,यशवंतराव चव्हाण
यांचा समावेश असतो पण
ज्या महाराष्ट्राला वसंतराव नाईकांनी ११ वर्ष
पोसले वाढविले.त्या व्याक्तीचा कधीच
त्याच्या तोंडुन नाव निघत नाही.यशवंतराव
चव्हाणांनी महाराष्ट्रासाठी बरेच काही केल
असेल ते ठिकच आहे कारण ते स्वत: मराठी होते पण
एका गैर मराठी माणसाने
महाराष्ट्रा करीता एवढे महान काम केले त्यांचे
कौतुक कधीच राज ठाकरेंच्या तोंडुन झालेले
नाही. अशीच अशीच प्रचिती महाराष्ट्र
शासना कडुन वसंतराव
नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आली.
मनसे समोर गोर बंजारा तरूणांना एकच सांगणे आहे
की. आपला गोर धर्म आहे बातीचे नंतर आणि गोर
धर्म महाराष्ट्रा पुरता नसुन
अवघ्या विश्वासाठी आहे.गोर
धर्माची एवढी संकुचित वृत्या नाही.गोर
धर्माची जोपासना करा…कोणाच्याह
ी आहारी जाऊ नका…गोर
धर्माची जोपासना करा तेव्हाच “मार गोर
केसुला नई मोरीयं..हे बोल सेवालालचे खरे ठरेल…
जुडो समाजेती अन् समाजेन जोडो…
जय सेवालाल जय गोर….
कैलास डी. राठोड