बंजारा समाजाच्या हिताचे हितचिंतन
माझे परममित्र प्रा. प्रकाश राठोड यांनी त्यांच्या लेखकत्वाची नैतिक जबाबदारी पेलून ‘बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती’ हा ग्रंथ बंजारा समाजाच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या मनातील पृथ्वीमध्ये उभाटलेल्या गुंतागुंतीच्या डोंगररांगांमधून क्रांतीचा ज्वालामुखी अस्वस्थ झाला आणि बंजारा समाजाचा सांस्कृतिक लाव्हा प्रवाहित होऊन वाहू लागला. त्यांच्या पृथ्वीच्या पोटातून अस्वस्थ लाव्ह्याचे…