Ravi Ade

बंजारा समाजाच्या उपजाती

बंजारा तत्सम जाती
बंजारा एक जात नाही तर एक जमात आहे.जमात म्हणजे टोळक्यांनी राहणारा समाज आपल्याकडे व्यवसायावरुन जातीचे नाव पडते. बंजारा म्हणजे बनडा (व्यापर) करणारा बंजारा असे नाव लदणी आणि व्यापार करणारा एका गोट नामक वंशाच्या जमातीला देण्यात आले आहे. देशात व्यापार करणाऱ्या अन्य कित्येक जमाती आहेत. त्यांना बंजारा नाव पडले नाही. याचा अर्थ जे लदेणी नामक व्यवसाय आणिा छोटा मोठा फिरस्ता व्यापार करीत होते.आणि टोळी करुन तांडा नामक वस्ती करुन राहत होते तेच बंजारे त्यात काही टांडयांनी मिठाची (लवण म्हणेजे मीठ) लेदणी केल्या त्यांना लमाणी नाव पडले हे टांडे जेव्हा आंध्र,कर्नाटकात गेले तेलगु भाषेच्या उच्चारणामुळे लमाणी लंबाडा लंबाडी असे नाव पडले.तात्पर्य गोटवंशीय गोरमाटी मुख्यता देशात बंजारा लंबाटा मुख्य नावांनी ओळखले जातात.याचे मुळ स्थान सिंधु घाटी परिसर आहे.त्यापैकी महत्वाच्या ७ उपजाती आढळुन येतात.त्या खालील प्रमाणे.

कलावंत तत्सम जमातीः-
बंजारा भारतीय जमात आहे. देशातील बावीस प्रांतात ती एकवीस नावानी ओळखली जाते.आज ही देशात आपली भाषा वेशभूषा आणि संस्कृती जतन करुन जगत असल्यामुळे बंजारा संस्कृती-भाषा असी स्वतंत्र ओळख या जमातीची आहे.अलिकडेच साहित्य अकादमीने बंजारा भाषा आणि संस्कृतीली मान्यता दिली आहे.त्यामुळे पुन्हा बंजारा जमातीची नव्याने साहित्य आणि समाजात ओळख हेाईल.

सामान्यतः-
ढाढी, ढालीया, सनार,जोगी,शिंगाडा, नाव्ही बंजारा टांडा एक व्यवसाय आहे.त्या व्यवस्थेच्या प्रमुखाला नामक म्हणतात.आपल्या टांडयातील लोकांच्या अडीअडचणी दुर करणे टांडयांच्या गरजा पूर्ण करणे हे नायकांचे कर्तव्य असते