जय जगदंबा माता, जय सेवादास दर वर्षी आपण काशी म्हणून गोर बंजारा समाजाचे तीर्थ स्थान पोहरागड या ठिकाणी सर्व बंजारा बांधव जमतो व आमचे कुल दैवत माता भवाणी आहे अशा पवित्र ठिकाणी आपले संत सेवादास महाराज यांच्या नावाने काशी पोसहरागड येथे यात्रेच्या निमित्ताने जमतो कारण आपली भेट भगवंताच्या दरबारात व्हावी एक मेकांचे चांगले विचार मिळावेत भगवंताचे दर्शन व्हावे व माझ्या जीवनात बदल व्हावे भगवंताला आवडेल असे माझे जीवन व्हावे. भवाणी मातेचे दर्शन व्हावे या करिता आपण जमत असतो. जसे संत ऋषीमुणी यांनी भगवंतासाठी झीजले व आपले शरिर भगवंताच्या कामी लावले असे संत सेवादास महाराज आपल्या बंजारा कुळात होऊन गेले.
त्यांनी अनेक संकटांना तोंड देऊन बंजारा समाजाला ज्ञान कर्म भक्ती समजावून देण्यासाठी व समाजाला जागृत करण्यासाठी अनेक प्रांतात फिरवले व समाजाला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्ग दाखवला त्या मार्गाणे सेवादास लिलाअमृत अनुस्वार न जाता आपण वेगळ्या मार्गाणे जात असावा असे वाटते कारण संत सेवादास लिलाअमृत अनुस्वार दि. 12 एप्रिल म्हणजे रामनवमी या दिवशी निजधामास गेले त्यांचे अंत्य संस्कार पोहरागड याठिकाणी रामनवमीला करण्यात आले संत सेवादास यांची समाधी बांधून चंदन, नींब, कास्टे आणून देह बसवण्यात आला असे सेवादास लिलाअमृत अनुस्वार वर्णण करण्यात आले आहे. जर सेवादास रामनवमीला गेले असेल तर आपण सेवादास महाराजांची पुण्यतिथी याच दिवशी साजरी केली पाहिजे. सर्व बंजारा बांधवांनी पोहरागड याठिकाणी पुण्यतिथी साजरी करावी सेवादास महाराजांना लहानपणी जे आवडत होते ते शिरा सेवादास यांनी मातीचा शिराबनवला व गोपाळांसंगे गाई चारल्या संत सेवादास यांना विशेष शिरा आवडत असावा संतांना जे आवडते तेच आपण केले पाहिजे समाजावर संताचे ऋषीचे ऋण आहेत ते फेडण्यासाठी त्यांचे विचार त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच ऋण फेडणे होय. सेवादास सांगतात कलयुगामध्ये पैसा हाच श्रेष्ठ देव मानतात लोक यज्ञ योगाशी नाही वाव सकळ धनाचे दास झाले आज प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे पण संत सांगतात जोडुनीया धन उत्तम व्यवहारे आपण जे व्यवहार करतो मेहनतच करुनच पैसा मिळवला पाहिजे मिळालेल्या पैशातून भगवंताचा भाग काढला पाहिजे कारण भगवंत आपल्या सोबत राबत आहे. जो भगवंताचा भाग काढत नाही तो चौर आहे असे स्वतः गितेत श्री कृष्ण भगवान सांगतात. देह काळाचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे.
त्या करीता भगवंताने आपणास जन्म कशासाठी दिलेला आहे कि माझे काम करीत पण आज भगवंताला विसरुण चालणार नाही ऋषीचे संताचे उपकार आहेत व आई वडीलांचे उपकार आहे. आई- वडीलांचे उपकार फेडण्यासाठी काहि बांधव श्राध करतात संताचे ऋण व ऋषीचे ऋण फेडण्यासाठी संताच्या विचाराप्रमाणे चालणे म्हणजेच संताचे ऋण फेडणे होय श्री कृष्ण भगवान सांगतात भगवंताचा भाग जर काढत नसेल तर तो पापच खातो तो चोर आहे भगवंत सांगतात पुर्वीच्या काळात आपले आई वडील मुडुपकाढीत होते व बालाजीला मुडूप अर्पण करीत असे तसेच आपण भगवंताचा भाग काढून पोहरागड तिर्थस्थानासाठी वापरावा हे भगवंताचे भाग होते जर आपली कमाई दर महा 1000 रु. असेल तरे काही भाग भगवंताचा भाग काढाचा भगवंताचा भाग जर काढलात तर ते लक्ष्मी बनते व प्रभु प्रसाद बनते. तेच पैसा संतोच्या कार्यासाठी देवाच्या कामासाठी वापरावा मरणार्या वेळेस सोबत भगवंताचे कामासाठी किती पैसा खर्च केला व भगवंताचे काम किती केले हेच आपल्या सोबत येणार आहे. गाडी, बंगला, काही, सोबत येणार नाही भगवंताला देवाच्या कार्याचा हिशोब द्यावा लागणार आहे म्हणून संत सेवादास सांगत अध्याय 34 वा ओवी 19 परपंच सारा लटीका व्यवहार सकळ मायेचा अवडंबर कधी करावा संत संग तेन आपले अंतकरण शुद्ध होईल अनायसे म्हणून राम नवमीलाबकरी देवीला बळी देऊन आपण आनंदाणे खात असतो. याच्या मुळे संत सेवादास व देवीला आनंद वाटत असेल काय? संत सेवादास सांगतात प्रत्येक पशु पक्षी जनजीवात देव आहे जेव्हा संत सेवादास माहुरला आले होते ते माहुरहून उनकेश्वर येथे आले व उष्ण पाण्याचे कुंड यामध्ये स्नान करुन पैन गंगेच्या तीरी मुक्काम करतात व रात्री मुक्काम झाल्यावर सकाळी काही जण संत सेवादास यांना सांगतात आम्ही शिकार करुण येतो म्हणून जंगलात जातात गेलेल्या लोकांना शिकार काही मिळत नव्हती म्हणून छावणीकडे निघाले तोच एका जाळीतून मोर बाहेर पडला सर्व जन त्यांच्या मागे लागले तेव्हा तो मोर घाबरुन संत सेवादास महाराजांकडे गेले व आपले आश्रु ढाळू लागला व महाराज मला अभय द्या आपण अवतारी पुरुष आहात संत सेवादास महाराज मयुरला विचारतो मला अवतारी पुरुष आहात कसे काय म्हणालास तेव्हा मयुर म्हणतो तुमच्या मध्ये हा श्रेष्ठ गुण आहे आणि सत्य काय आहे कळते.
आपल्या जीवा समान । जाणतोशी अण्य प्राण हिंशे लागी नाही स्थान सेवका तुझ्या अंतरी असे मयुर सेवादास यांना सांगतो व आपले आश्रु ढाळतो. तेव्हा सर्व शिकार्यांना बोलवून आपण श्रत्रिय आहोत करीता वाघ सिंहाची शिकार की पाहिजे. करीता मोराला कोणी मारु नका.
अध्याय 29 ओवी 57 मारील जो कोणी मोरासी, वंश वाढेणा कदापी धण्य माया त्या पाखराचे असे संत सेवादास सांगतात. यावरुन लक्षात येते यांना हिंसा करणे आवडत नाही. संत सेवादास हेद्राबाद येथे गेल्यानंतर बादशहा हप्पा बधुला विचारतात गाई हजारो आहेत करीता कासयासी ठेवता काय! कारण त्याचे मला सांगा. तेव्हा बधु सांगतो गोण्या लादतो बैलावरी आमचा आहार श्रसात्वीक, दुध गाईचा आम्हा लाभतसे असे गाई गोधन आमचे दैवत आहे. आणि आम्ही गाईची पुजा करतोत. आम्ही मांसाहरी नाहीत. असे बधु बाधशासी सांगतो पण आज काही बांधव कसायाली गाई विकताक म्हणून बधु सांगतात अध्यय 34 ओवी 10 ससे कोंबडे मृगे । पोट जाळीती जिवे मारुणी बकरी देवीला बळी देऊणी खाती आनंदाने असे संत सेवादास यांना आवडत नाही करीता आम्ही बकर्याचा बळी व्यर्थच आहे म्हणून यावर्षी राम नवमीला संत सेवादास यांना बालपणी शिरा आवडतो त्यांचा भोग लावूया व राम नवमीला पुण्यतिथी साजरी करुया दर वर्षी सोबत बकरी व भांडी सोबत आणत होतो व बकर्याचा बळी देत होतो तसे न करता संत सेवादास यांना आवडणारा शिरा बनवण्यासाठी प्रत्येक पाव किलो रवा व साखर व गट प्रमुखाणे एक छटाक तुप आणावे व भांडी आणावे व आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत त्या ठिकाणी भोग लावावा हे सर्व पाहून संत सेवादास माता भवाणी आनंदीत होतील व पुन्हा आपल्या समाजात पुन्हा येण्याची इच्छा होईल करीता सर्व समाज बांधवांना माता भवाणी संत सेवादास सदबुद्धी देतील अशी प्रार्थना करतो.
नोट : भारतातील सर्व बंजारा बांधवांनी सेवादास पुण्यतिथीचा कार्यक्रम पट्टी न करता सामुहिक साजरी करावी व तांडय़ातील बालक व युवक यांना भाषण करण्यास प्रवृत्त करावे. जय सेवादास…
मोहण बापुराव राठोड
रा. चोंडी ता. लोहा जि. नांदेड
मो. 9421768140