संपूर्ण भारतवर्षातील हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, शेतकऱ्यांचे कैवारी, कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले जाणते नेते, तमाम महाराष्ट्रवासीयांचे दीपस्तंभ, आमचे प्रेरणास्थान, ‘विकासाचे महानायक’ आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नजिकच्या परिसरातील सर्व वसंतप्रेमी समाजबांधवांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येते कि, त्यांनी या वर्षांपासून 1 जुलै च्या जयंती कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक प्रतिष्ठान ची अविकसित जागा (मंत्रालयासमोर); वसंतराव नाईक पुतळा, विधानभवनातील शासकीय आदरांजली कार्यक्रम,आ. हरिभाऊ राठोड आयोजित आझाद मैदान येथील जयंती कार्यक्रम तसेच कृषिदिनानिमित्त वसंतरावजी नाईक कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान आयोजित ‘कृषी पुरस्कार वितरण समारंभ’ या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे……!!!
बंधूंनो, मागील दोन-अडीच वर्षांपासून आलेल्या या सरकारने वसंतराव नाईक साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न चालवलेला आहे असे नेहमी वाटतआहे.
1) मंत्रालयासमोरील यशवंतराव प्रतिष्ठान शेजारील, संत सेवालाल चौकाजवळील वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या जागेच्या प्रश्नाला जाणीवपूर्वक ताटकळत ठेवणे व त्या ठिकाणी वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे बांधकाम सुरू करण्यास अजूनही परवानगी न देणे,
2) मागच्या 2 वर्षापूर्वी 1 जुलै- कृषिदिनानिमित्त घेण्यात येणारा ‘कृषी पुरस्कार वितरण समारंभ’खोडसाळपणाने 10 जुलैला घेण्यात येणे; व त्याद्वारे मागील 20-25 वर्षापासून चालत आलेली परंपरा, राजकीय शिष्टाचार मोडीत काढणे,
3) मागील दोन वर्षांपासून वसंतरावजी नाईक पुतळा, विधानभवन येथे होणाऱ्या शासकीय आदरांजली कार्यक्रमास या सरकारमधील कोणीही मंत्री किंवा साधे आमदार जाणीवपूर्वक हजर नसणे;
4) दरवर्षी 1 जुलै हा दिवस ‘महाराष्ट्र कृषिदिन’ म्हणून 20-25 वर्षांपासून मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतांना व मागील काही वर्षांपासून आत्महत्याग्रस्त झालेल्या देशातील शेतकऱ्याला-बळीराजाला नवी प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कार्याला, त्यागाला सलाम करण्यासाठी, नाईक साहेबांनी देशातील हरितक्रांतीला, कृषिउद्योगक्रांतीला दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून 1 जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय कृषिदिन’ म्हणून घोषित करण्याची जोरदार, एकमुखी मागणी होत असतांना देखील या वर्षी जाणिपूर्वक 20 मे रोजी अचानक शासन निर्णय काढून वास्तविक 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिवस’म्हणून घोषित असतांना देखील 1 जुलै हा दिवस ‘राज्य मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे अतार्किक शासकीय आदेश देणे, पुनः हा शासन निर्णय रद्द करण्याची नामुस्की येणे,
5) प्रतिवर्षी 1 जुलै हा दिवस शासनाद्वारे सर्व स्तरावर अधिकृतरित्या ‘महाराष्ट्र कृषिदिन’ म्हणून साजरा करण्याचे शासकीय आदेश काढल्या जाणे आणि यावर्षी जाणीवपूर्वक खोडसाळपणे तसा शासन आदेश न काढुन प्रशासकीय निर्बुद्धता,अनास्था दाखवणे,
6) ऑलरेडी 1 जुलै ‘महाराष्ट्र कृषिदिन’ म्हणून साजरा केला जात असतांना देखील मागील वर्षी याच दिवशी 2 कोटी, यावर्षी 4 कोटी वृक्षांची रोपण करून 1 जुलै हा दिवस ‘वृक्षारोपण दिवस’ म्हणून साजरा करण्याचा अनाठायी घाट घालणे, वास्तवतः या स्तुत्य उपक्रमास ‘वसंतरावजी नाईक वृक्षारोपण कार्यक्रम’ किंवा ‘वसंतरावजी नाईक महाराष्ट्र हरितसेना’ असे संयुक्तिक नामकरण करण्याची संधी असतांना देखील वृक्षारोपणाच्या या सर्व उपक्रमात वसंतरावजी नाईक साहेबांचा जाणीवपूर्वक नामोल्लेख टाळणे हे सर्व अनाकलनीय आहे.
या आणि अशा इतर अनेक बाबी, प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर सरकार दरबारी पडून आहेत. या सर्व बाबी विषयी संघटित होऊन लढण्यासाठी व सरकार पर्यंत आपला आवाज पोहचवण्यासाठी चला या वर्षी वसंतरावजी नाईक जयंती सोबत मिळून मंत्रालय आणि त्या परिसरात मोठया प्रमाणात साजरी करू या. या सर्व कार्यक्रमात आपली उपस्थिती अगत्याची व प्रार्थनिय आहे…….!!!
सर्वप्रथम……..
1) वसंतराव नाईक प्रतिष्ठानची अविकसित जागा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शेजारी,संत सेवालाल चौकाजवळ,मंत्रालयासमोर
(सकाळी 8:30 ते 9:30)
तद्नंतर………
2) शासकीय अभिवादनाचा कार्यक्रम
वसंतराव नाईक पुतळा, विधानभवन, मुंबई
(सकाळी 10 ते 11)
3) आ. हरिभाऊ राठोड आयोजित आझाद मैदान येथील जयंती कार्यक्रम
(दुपारी 12 ते 4)
आणि शेवटी……..
4) वसंतराव नाईक कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान आयोजित “कृषी पुरस्कार वितरण समारंभ”
के सी महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई
(संध्याकाळी 5 ते 8)
????????????।जय वसंत,जय सेवालाल।????????????
Tag: Vasantrao Naik, ex CM Maharashra, Vasantrao Naik 104 Jayanti Govind Rathod