*महानायक-वसंतराव नाईक प्रतिष्ठाण,मंत्रालय जवळील*एक एकर जमीन *मेट्रोरेल-अतिक्रमणाचा????डाव मुंबई,मंत्रालय परिसरातील गोर-बंजारा-सामाजिक कार्यकर्त्यांनी उधळून लावला*???????? मुंबई:-मुंबईतील मंत्रालय समोरील *संत सेवालाल चौक स्थित वसंतराव नाईक कूषी ग्रामीण प्रतिष्ठाणच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव गोर-बंजारा सैनिकांच्या सर्तकतेने उधळून लावला आहे, याबाबत सविस्तर असे की वसंतराव नाईक कूषी व ग्रामीण प्रतिष्ठाण, शैक्षणिक व सामाजिक विकास इमारत करिता शासनाकडून 99वर्षाचे भाडे तत्त्वावर जवळपास एक एकर जमीन मिळाली आहे. त्यावर बरीच वर्षे कोणतेही बांधकाम झाले नसल्याने तसेच सदरील जागेला लागून जवळील,समोरील मोकळी जागा *अशोकराव चव्हाण,महसूल मंत्री असताना ते स्वतः अध्यक्ष असलेल्या *शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी शासनाची दिशाभूल करून व राजकीय पदाचा गैरवापर करून बळकावली आहे.
याबाबत दोन प्रतिष्ठान मधील रस्त्यांचा वाद न्यायालायत प्रंलंबित होता. या जागेसमोर गोर बंजारा समाज सेवक *1जुलैला विकासाचे महानायक,माजी मुख्यमंत्री-वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करून या ठिकाणी प्रतिष्ठाणची भव्य शैक्षणिक व सामाजिक इमारत???? उभी रहावी म्हणून *नाईक परिवारातील वंशज व प्रतिष्ठान मधील सर्व सन्मानीय पदाधिकारी यांचे कडे सतत तगादा लावून सतत प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मुंबई,मंत्रालय व विधानभवन परिसरात भव्य आक्रोश *रॅली काढून विधान भवन, मंत्रालय परिसरात 1जुलै2017 रोजी निदर्शने देखील केली आहे व प्रतिष्ठानकडून बांधकामांचे आश्र्वासन देखील मिळवले होते. नोव्हेंबर 2017 या महिन्यात रस्त्याचा प्रश्न देखील निकाली निघाला असल्याने लवकरच इमारत उभी राहणार म्हणून वसंतसैनिक आनंदात होते. तितक्यात बाधकाम चालू झाल्याचे पाहून त्यांचा आंनद गगणात मावेनासा झाला होता. या रस्ताने रितेश पवार सर या वसंत सैनिकाची नेहमी ये जा असते व ते जागेवर नेहमी लक्ष ठेवून असतात तसेच सामाजिक कार्यकर्ते – राजेश चव्हाण व *संदीप चव्हाण (जिंतूरकर),मुंबई हे मनोरा आमदार निवास परिसरातून या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून बरकायीने लक्ष???? ठेवून असतात. दोन दिवस अगोदर रितेश पवार सर रस्त्याने जात असतांना त्यांना प्रतिष्ठाणच्या जागेवर काहीतरी बांधकाम करतांना काही लोक दिसले, आणी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यावर त्यांनी सुरक्षारक्षकास विचारणा केली की सदर ठिकाणी प्रतिष्ठानची भव्य-दिव्य इमारत???? उभी राहणार होती. तर नुसते फ्लोरींग चे काम का चालू आहे. त्यावर कर्मचारी ने **हमे कुच्छ भी मालूम नही, बडे सहाब को सब मालूम है * हमे सिर्फ मेट्रो-रेल्वे का बांधकाम करणे का ऑर्डर मिला है. ..आता मात्र त्याच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांनी लगेच राजेश चव्हाण, *संदीप चव्हाण(जिंतूरकर) यांना फोन करून वस्तूस्थिती माहीत करून घेतली. नंतर राजेश चव्हाण व *संदीप चव्हाण(जिंतूरकर), पत्रकार-गोविंद राठोड यांनी एकत्र बसून विचार-विनिमय केले व ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष मा.राजूसिंग नाईक व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना कळवले. प्रतिष्ठानचे सदस्य व गोर-बंजारा सैनिकानी एकत्रीत धडक देऊन बेकायदेशीर बांधकाम बंद पाडले आहे.
Tag: Vasanrao Naik Pratishthan Place near Sant sevalal Maharaj Chouck, Mumbai